Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा! जंतर-मंतर सिझन 2 लवकरच…नेमकं काय होणार?

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये आंदोलन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. आता कॉकरोच जनता पार्टीने आपली कार्यकारणी जाहीर केली आहे. आ

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा! जंतर-मंतर सिझन 2 लवकरच...नेमकं काय होणार?
abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 8:47 PM

Abhijeet Dipke New Protest Announcement : कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये आंदोलन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. आता कॉकरोच जनता पार्टीने आपली कार्यकारणी जाहीर केली आहे. आता ही पार्टी देशभरात काम करणार आहे. दरम्यान, दिल्लीचे आंदोलन संपल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टी नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असे असतानाच आता अभिजीत दीपके यांनी मोठी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या घोषणेत सीजेपी पुढे काय करणार? याबाबत त्यांनी सांगितले आहे.

अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले?

अभिजीत दीपके यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सीजेपी पुढे नेमकं काय करणार? असं विचारण्यात आलं. या प्रश्नाचे उत्तर देताना लोक इन्स्टाग्रामवर ‘जंतर मंतर सिझन -2’ कधी येणार असे विचारत होते. आता लवकरच जंतर मंतर सिझन 2 येणार आहे, असे दीपके म्हणाले.

बैठकीला हॉल मिळाला नाही, 15 ऑगस्टपासून विशेष मोहीम

बुधवारी सीजेपीची दिल्लीत एक बैठक होणार होती. परंतु ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. भाजपाचा दबाव असल्याने आम्हाला बैठकीसाठी हॉल मिळत नाहीये, असा आरोप दीपके यांनी केला आहे. दुसरीकडे दीपके यांनी देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजीपासून शासकीय शाळांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आमच्याकडून मोहीम राबवली जाईल, अशी घोषणा सीजेपीने केली आहे. दीपके या मोहिमेची अंमलबजावणी त्यांच्या हिंगोली गावातील शाळेपासून करणार आहेत.

वेगवेगळ्या चर्चांना उधाण

दरम्यान, सध्या झारखंडमध्येही सीजेपीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नोकरी, शिक्षणव्यवस्थेच्या मुद्द्यावरून येथे विद्यार्थी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला दीपके यांनी पाठिंबा दिलेला आहे. असे असताना आता आम्ही लवकरच जंतर मंतरवर नवी मोहीम सुरू करणार आहोत, नव्या मुद्द्याला घेऊन आंदोलन उभे करणार आहोत, असे दीपके यांनी सांगितल्यामुळे ते नेमकं काय करणार आहेत? कोणत्या मुद्द्याला घेऊन ते आंदोलन करणार आहेत, याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us