Dharmendra Pradhan Resign News LIVE : जालना शहरात मेणबत्त्या लावत सरकारचे निषेध आंदोलन

CJP Jantar Mantar Delhi News Live Updates in Marathi : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्यासमोरच सरकार झुकलं आहे. हमारे सरकार में इस्तीफे नही होते, म्हणणाऱ्या मोदी सरकारला अखेर जेनजी समोर झुकावं लागलं आहे. प्रधान यांनी राजीनामा दिल्याने युवा शक्तीचा मोठा विजय झाला आहे.

Dharmendra Pradhan Resign News LIVE : जालना शहरात मेणबत्त्या लावत सरकारचे निषेध आंदोलन
dharmendra pradhan
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2026 | 9:01 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Jul 2026 09:00 PM (IST)

    जालना शहरात मेणबत्त्या लावत सरकारचे निषेध आंदोलन

    दिल्लीतल्या जंतरमंतर येथे आंदोलनावेळी विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून आज जालना शहरातल्या मस्तगड येथे मेणबत्त्या लावत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.  मस्तगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मेणबत्ती सत्याग्रह आंदोलन केले आहे.

  • 25 Jul 2026 08:31 PM (IST)

    केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त चार्ज प्रल्हाद जोशी यांच्याकडे

    केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त चार्ज प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.


  • 25 Jul 2026 08:17 PM (IST)

    पुढील केंद्रीय शिक्षण मंत्री हा प्रामाणिक असावा, जळगावात विद्यार्थ्यांचा जल्लोष

    NEET पेपर फुटीनंतर जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांना जळगावच्या चाळीसगाव येथे आज श्रद्धांजली वाहण्यात आली तसचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे जल्लोष करुन स्वागत करण्यात आले. चाळीसगाव शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॉक्रोज जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि विद्यार्थी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. पुढील केंद्रीय शिक्षण मंत्री हा प्रामाणिक, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा, अशी मागणी करण्यात आली.

  • 25 Jul 2026 07:36 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये जल्लोष

    मुंबई : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये जल्लोष करण्यात आला. ढोल वाजवत तरुणांनी केला जल्लोष केला. भर पावसात जल्लोष झाला. हातात विजयोत्सवाचे बॅनर घेत शिवाजी पार्कवर जल्लोष करण्यात आला.

  • 25 Jul 2026 06:54 PM (IST)

    मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारे यांनी दिली प्रतिक्रिया

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत. माझी 22 उपोषण झाली पण कधी हिंसा केली नाही. राजीनाम्यानंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही. मात्र समाजाच्या भलाईसाठी जे जे करता येईल ते करत रहा. राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंनीं प्रतिक्रिया दिली.


  • 25 Jul 2026 06:50 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार

    शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते नागपूरमध्ये होते आणि तेथून दिल्लीला रवाना झाले. ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

  • 25 Jul 2026 06:35 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचं ट्वीट, म्हणाले…

    ‘धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा राबवल्या. व्यापक समाजकल्याणाप्रति आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे लक्षण आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.’, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 25 Jul 2026 06:27 PM (IST)

    परकीय निधीच्या आरोपावर सीजेपी प्रवक्ते सौरभ दास काय म्हणाले?

    दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील 400 सोशल मीडिया हँडल्स सीजेपीच्या आंदोलनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भडकवत होते आणि परदेशी निधीचे आरोपही केले जात आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालयानेच मान्य केले आहे की कोणताही परदेशी निधी नव्हता आणि दिल्ली पोलिसांनी आपले काम केले.

  • 25 Jul 2026 06:25 PM (IST)

    दिल्लीत जे काही घडलं त्यासाठी अमित शाह जबाबदार- राहुल गांधी

    दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरलं आहे. राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारवर टीकास्त्र सोडलं.

  • 25 Jul 2026 06:16 PM (IST)

    हा विद्यार्थ्यांचा विजय आहे, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

    देशातील शिक्षण व्यवस्थेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी दोन गोष्टी विसरू नये. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्या त्यांना शिक्षा करावी आणि या कारवाईप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी.

  • 25 Jul 2026 06:11 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मेहबूबा मुफ्ती झाल्या व्यक्त

    पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर एक निवेदन जारी केले आहे. त्या म्हणाल्या, “हा भारतातील तरुणांचा विजय आहे, जे अनेक दिवस भुकेले आणि तहानलेले उभे होते. त्यांनी कोणत्याही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. माझा विश्वास आहे की गांधीजींचा भारत आपली ओळख प्रस्थापित करत आहे. आमचे तरुण हिंदू-मुस्लिम वादावर विश्वास ठेवत नाहीत, ध्रुवीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत. माझा विश्वास आहे की भारत सुरक्षित हातात आहे. भारत कसा असावा याच्या नियोजनाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.”

  • 25 Jul 2026 06:04 PM (IST)

    अमित शाह यांनी घेतली धर्मेंद्र प्रधान यांची भेट

    सूत्रांनुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 6 कुशक रोड येथे आले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी सुमारे अर्धा तास थांबले.  वृत्तानुसार, अमित शाह यांनी त्यांच्यासोबत सद्यस्थिती आणि राजीनाम्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर चर्चा केली.

  • 25 Jul 2026 05:54 PM (IST)

    भविष्यातील वाटचालीसाठी धर्मेंद्र प्रधान यांना शुभेच्छा – नितिन नबीन

    भाजपचे अध्यक्ष नितिन नबीन यांनी धर्मेंद्र प्रधान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच ऐतिहासिक राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि इतर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता जनहिताला प्राधान्य देत पद सोडण्याचा त्यांचा निर्णय सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेच्या सर्वोच्च मानदंडांचे दर्शन घडवतो. पक्ष या निर्णयात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो’

  • 25 Jul 2026 05:42 PM (IST)

    कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, अखेर आंदोलन मागे…

    कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे.

  • 25 Jul 2026 05:40 PM (IST)

    हा भारतातील तरुणांचा विजय – मेहबुबा मुफ्ती

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, ‘हा भारतातील तरुणांचा विजय आहे, जे इतके दिवस अन्न-पाण्याची पर्वा न करता तिथे ठामपणे आंदोलन करत राहिले. त्यांनी कोणत्याही प्रकारची हिंसा केली नाही. मला वाटते की गांधींचा भारत आता आपली ओळख निर्माण करत आहे.’

  • 25 Jul 2026 05:24 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भंडाऱ्यात युवकांचा जल्लोष

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच भंडाऱ्यामध्ये तरुणांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. शहरातील गांधी चौकात एकत्र येत युवकांनी एकमेकांना पेढे भरवले आणि फटाक्यांची आतिशबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर मोदी सरकार युवकांसमोर नमल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • 25 Jul 2026 05:12 PM (IST)

    पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी – राहुल गांधी

    शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यावर बोलताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे मोठं आणि प्रतिकात्मक पाऊल आहे. रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक तरुणाचं मी अभिनंदन करतो. तसेच शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचंही अभिनंदन करतो. डरो मत, फाईट करा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.’

  • 25 Jul 2026 04:44 PM (IST)

    उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची पत्रकार परिषद, नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांचं कौतुक केलं आहे.

  • 25 Jul 2026 04:33 PM (IST)

    सीजेपी आणि सरकारची बैठक सुरू

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळ आणि सरकारची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 25 Jul 2026 04:11 PM (IST)

    धर्मंद्र प्रधान यांचा राजीनामा, देशातील तरुणांच्या एकजुटीचा विजय – शरद पवार

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, हा तरुणांच्या एकजुटीचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा हा लढा ही लोकशाहीच्या साक्षीचं प्रतिक आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

  • 25 Jul 2026 04:07 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कल्याणच्या फटके मैदानात जल्लोष

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच कल्याणच्या फडके मैदानावर आंदोलनकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.   काळपासून आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होतं.

  • 25 Jul 2026 03:53 PM (IST)

    लोकशाहीचा विजय, शांतता, संयमाचा हा विजय आहे- सोनम वांगचूक

    हा लोकशाहीचा विजय आहे… थेट लोकशाही… जी रस्त्यांवरून साकारली आहे. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे. CJP आणि देशातील Gen Z यांचे अभिनंदन; तसेच भीती आणि भीतीची भीतीही झटकून टाकून देशाच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या सर्व नागरिकांचे आभार. जबाबदारी निश्चितीकडून आता सुधारणांकडे…

  • 25 Jul 2026 03:45 PM (IST)

    हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय- शरद पवार

    NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग
    पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.

  • 25 Jul 2026 03:33 PM (IST)

    मी खूप खूश आहे, धमेंद्र यांच्या राजीनाम्यावर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

    मी खूप खूश आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रियंका गांधी यांची पहिली प्रतिक्रिया.

  • 25 Jul 2026 03:32 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

    धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार.

  • 25 Jul 2026 03:30 PM (IST)

    एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

    धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.

  • 25 Jul 2026 03:30 PM (IST)

    Dharmendra Pradhan Resigns : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचूक यांची पहिली प्रतिक्रिया

    शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 26 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  ‘भीतीची भीतीही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार’ असं वांगचूक यांनी म्हटलं. सीजेपी आणि तरूणांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे.

     

     

  • 25 Jul 2026 03:25 PM (IST)

    देशातील लोकशाहीने कात टाकली आहे – धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचं ट्विट

    नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.’ देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं ‘असं पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

     

  • 25 Jul 2026 03:08 PM (IST)

    सांगली – मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष

    नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगली काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतीशबाजी करत काँग्रेसच्यावतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा स्वागत करण्यात आले. काँग्रेस कमिटी समोर माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्या बद्दल जोरदार घोषणाबाजी करत देशातल्या युवकांचा हा विजय असल्याचा प्रतिक्रिया दिली आहे.

  • 25 Jul 2026 03:06 PM (IST)

    Dharmendra Pradhan Resigns : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट

    धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे ायंनी ट्विट केलं आहे.

     

  • 25 Jul 2026 02:59 PM (IST)

    Dharmendra Pradhan Resigns : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पत्रात काय म्हटलंय ?

    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्यासमोरच सरकार झुकलं आहे अशी प्रतिक्रिया आता सर्वत्र व्यक्त होत आहे. प्रधान यांनी राजीनाम्याचं पत्रं ट्विट केलं आहे. काय म्हटलं आहे त्यात ?

     

  • 25 Jul 2026 02:34 PM (IST)

    हा युवाशक्तीचा विजय आहे- खासदार बळवंत वानखेडे

    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवाशक्तीचा विजय आहे. या आधीच राजीनामा झाला असता तर एवढा संघर्ष उभा राहिला नसता. भारतीय जनता पार्टी पक्ष आता बॅकफुट वरती गेला आहे. काँग्रेस पक्ष युवकांच्या पाठीशी कायमच सोबत राहील असे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे म्हणाले.

  • 25 Jul 2026 02:24 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, सीजेपीचं मोठं यश

    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल आहे.

  • 25 Jul 2026 02:23 PM (IST)

    अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

    गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

  • 25 Jul 2026 01:55 PM (IST)

    दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज

    दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात पुन्हा गोंधळाचं वातावरण असून विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज झाल्याची माहिती मिळत आहे.  तसेच जंतरमंतर परिसरामध्ये दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.  संसद भवनाकडे जाणाऱ्या टॉलस्टॉय मार्गावर हा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 25 Jul 2026 01:53 PM (IST)

    सोशल मीडियावरून पाकमधून फेक कंटेट पसरवले जात आहेत – दिल्ली पोलीस

    सोशल मीडियावरून पाकमधून फेक कंटेट पसरवले जात आहेत अशी माहिदी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. 400 हून अधिक  अकाऊंटची ओळख पटवण्यात आली. ऑपरेशन सिंदूर वेळी सुद्धा फेक कंटेंट पसरवण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलं.

    विद्यार्थी आंदोलनादरम्यान  एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचंही पोलिसांकडून खंडन करण्यात आलं.

  • 25 Jul 2026 01:36 PM (IST)

    सरकारसोबतच्या CJP च्या चर्चेच्या वेळेत बदल

    ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या तिसऱ्या फेरीचे वेळेत बदल झाला आहे.  CJP आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील बैठक आता दुपारी 4 वाजता होणार आहे. ही चर्चा दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये पार पडेल.

  • 25 Jul 2026 01:24 PM (IST)

    जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरारमध्ये आज तरुणाई रस्त्यावर उतरली

    दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरार मध्ये आज तरुणाई रस्त्यावर उतरली.  हातात तिरंगा झेंडा घेवून, दिल्लीतील लाठीचार्ज चा निषेध व्यक्त करीत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.  विरार पश्चिम विवा कॉलेज समोरील मुख्य रस्त्यावर आज सकाळी 11 ते 12 एक तास आंदोलन करण्यात आलं.   या आंदोलनात, विद्यार्थी, पालक मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन दिल्ली तील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

  • 25 Jul 2026 01:03 PM (IST)

    ममता बॅनर्जी सोमवारी जंतरमंतर येथील आंदोलनाला भेट देणार

    पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी जंतरमंतर येथील आंदोलनाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ममता बॅनर्जी सहभागी होणार असल्याचे समजते.

  • 25 Jul 2026 12:52 PM (IST)

    राज ठाकरे आणि संजय राऊत यांची शिवतीर्थावर झाली बैठक

    राज ठाकरे आणि संजय राऊत यांची शिवतीर्थावर बैठक,  राऊत आणि राज ठाकरे  यांच्या 15 मिनिटं झाली चर्चा. उद्याच्या मोर्चाच्या पार्अशवभूमीवर,  समन्वय, भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर चर्चा झाल्याचे समजते.  नंतर राज ठाकरे आणि शरद पवारांची फोन वरून चर्चा झाली.

  • 25 Jul 2026 12:35 PM (IST)

    मोदींनी गेल्या 12 वर्षांत फक्त घाबरवून ठेवलंय – अभिजीत दीपकेंचं टीकास्त्र

    मोदींनी गेल्या 12 वर्षांत फक्त घाबरवून ठेवलंय.  12 वर्षांत एवढं घाबरवलं की आता भीतीच संपली आहे. शिकलेले पंतप्रधान असणं आवश्यक आहे , अशा शब्दांत अभिजीत दीपके यांनी मोदींवर टीका केली.

  • 25 Jul 2026 12:32 PM (IST)

    पोलिसांची वर्दी काढा आणि RSS चे कपडे घाला – दिल्ली पोलिसांवर भडकले अभिजीत दिपके

    दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून RSS चे कपडे घालावेत. दिल्ली पोलिसांचे अधिकारी पाहिले तरी राग येतो – अभिजीत दिपके संतापले

  • 25 Jul 2026 12:24 PM (IST)

    CJP Protest : प्रधानांचा लवकर राजीनामा घ्या , नाहीतर तुमचा नंबर – दीपके यांचा मोदींना इशारा

    शिक्षणमंत्री प्रधानांचा लवकर राजीनामा घ्या , नाहीतर तुमचा नंबर येईल, असा थेट इशारा अभिजीत दीपके यांनी मोदींना दिला.  जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी, आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

  • 25 Jul 2026 12:20 PM (IST)

    CJP Protest : जेवढे जेलमध्ये टाकाल , तेवढे जास्त आंदोलनात येतील – अभिजीत दीपके

    जेवढे जेलमध्ये टाकाल , तेवढे जास्त आंदोलनात येतील. काल मुंबईत जंतमंतर पेक्षाही मोठं आंदोलन झालं. प्रधानांचा राजीनामाच हवा – अभिजीत दीपके

  • 25 Jul 2026 12:19 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – अभिजीत दीपके मागणीवर ठाम

    सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे रुग्णालयातून जंतरमंतरवर दाखल झाले आहेत, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी मागणी करत ते भूमिकेवर ठाम आहेत.

  • 25 Jul 2026 12:13 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचे व्हिडीओ शेअर करण्यावर अंतरिम बंदी

    सुप्रीम कोर्टाचे व्हिडीओ शेअर करण्यावर अंतरिम बंदी घालण्यात आली आहे.  न्यायालय म्हणजे मनोरंजन वाहिनी नव्हे, असे ताशेरे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ओढले. त्यामुळे आता पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयीन कामकाजाचे व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावर पोस्ट, रिपोस्ट किंवा अपलोड करण्यास अंतरिम बंदी घालण्यात आली आहे.

  • 25 Jul 2026 12:04 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शरद पवारांना उद्याच्या तिरंगा मोर्चाचे आमंत्रण

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उद्याच्या तिरंगा मोर्चाचे आमंत्रण दिलं अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे समजते.

    उद्याच्या तिरंगा मोर्चामध्ये संदर्भात रणनीती आखण्यात आली आहे. उद्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.  याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसकडून या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचे सांगत पाठिंबा दर्शवला होता.

  • 25 Jul 2026 12:00 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी – राहुल गांधी आक्रमक

    हजारो विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाली. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी – राहुल गांधींनी केली मागणी.

  • 25 Jul 2026 11:54 AM (IST)

    धर्मेंद्र प्रधान भ्रष्ट, राजीनामा द्यावाच लागेल – राहुल गांधीची मागणी

    धर्मेंद्र प्रधान भ्रष्ट, राजीनामा द्यावाच लागेल, धर्मेद्र प्रधान यांना दुसऱ्या मंत्रालयात टाकणं मान्य नाही. खातेबदल नकोच, त्यांचा राजीनामा हवा, तडजोड मान्य नाही – राहुल गांधी यांची मागणी

  • 25 Jul 2026 11:52 AM (IST)

    विद्यार्थ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या सरकारने पूर्ण कराव्यात, त्यावर कोणतीही तडजोड नाही- राहुल गांधी

    उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली . विद्यार्थ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या सरकारने पूर्ण कराव्यात , त्या 3 मागण्यांवर कोणतीही तडजोड नको, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 25 Jul 2026 11:37 AM (IST)

    पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित आणि उपायुक्त जयंत मीना राज ठाकरे यांच्या भेटीला

    पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित आणि उपायुक्त जयंत मीना राज ठाकरे यांच्याशी आज बैठक होत आहे.  ठाकरे बंधूच्या उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडत आहे.  मात्र अद्यापही पोलिस प्रशासनाकडून या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. आज दुपार पर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

  • 25 Jul 2026 11:20 AM (IST)

    दिल्ली पोलिसांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद

    कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदलनसंदर्भात दिल्ली पोलिसांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे.या पत्रकार परिषेदत पोलिसांकडून काय सांगितलं जातंय हे पाहणं महत्वाचं असेल.

  • 25 Jul 2026 11:09 AM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे – नाना पटोले

    पेपरफुटीमुळे 22पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आत्महत्या झाल्या. जंतरमंतरवर आलेले विद्यार्थी आपल्या अधिकाराच्या लढाईसाठी आले होते, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नव्हते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे  अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. काँग्रेसतर्फे आज देशभरात कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

  • 25 Jul 2026 11:03 AM (IST)

    जळगावच्या नवीपेठेत विठुरायाच्या मनमोहक रांगोळीने वेधले नागरिकांचे लक्ष

    जळगावच्या नवीपेठेत विठुरायाच्या मनमोहक रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधलं.  रांगोळीतून भारती सपकाळे यांनी घरासमोर हुबेहूब विठुरायाची कलाकृती साकारली.  रांगोळीतून विविध रंगांचा सुरेख वापर करून विठुरायाचे मनमोहक रूप रांगोळीत साकारण्यात आले. रांगोळीतील रंगसंगती, बारकावे आणि भक्तिभाव यामुळे ही कलाकृती परिसरात नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

  • 25 Jul 2026 10:50 AM (IST)

    जंतर-मंतरवर 10,000 लोक उपस्थित : पोलीस सूत्रांची माहिती

    जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील चकमकीत 130 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी केला असून, याप्रकरणी 15 (FIR) दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात 65 विद्यार्थीही जखमी झाले आहेत. जंतर-मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अंदाजे 10,000 लोक उपस्थित असून आणि तिथे 3 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, आंदोलनस्थळी भेट दिलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2 हजारांहून अधिक व्यक्तींची पोलिसांनी आतापर्यंत ओळख पटवली आहे.

  • 25 Jul 2026 10:44 AM (IST)

    कल्याणमध्ये विठूनामाचा गजर ! वारकरी समुदायाची भव्य दिंडी

    कल्याणमध्ये विठूनामाचा गजर! आषाढी एकादशी निमित्त बिर्ला शैक्षणिक संस्था आणि वारकरी समुदायाने प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरापर्यंत भव्य दिंडी काढली.

    तुळशीवृंदावन, लेझीम, ढोल-ताशे, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि अभंगांच्या गजराने परिसर विठ्ठलमय झाला होता.  ‘झाडे लावा-झाडे जगवा’, ‘मुली वाचवा-मुलींना शिकवा’ आणि ‘आरोग्य व ध्यान’ यांसारखे सामाजिक संदेश देत भक्ती आणि जनजागृतीचा अनोखा संगम दिसून आला.

  • 25 Jul 2026 10:37 AM (IST)

    मेट्रो, अन्न, इंटरनेट बंद केलं, पण पेपरफुटी थांबवून शकलं नाही – राहुल गांधीचा हल्लाबोल

    मेट्रो, अन्न, इंटरनेट बंद केलं, पण पेपरफुटी थांबवून शकलं नाही असं ट्विट करत राहुल गांधींनी सरकारवर  हल्लाबोल केला. मेट्रो, रस्ते, इंटरनेट बंद करून आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

     

  • 25 Jul 2026 10:32 AM (IST)

    आज तोडगा निघाला नाही तर पुन्हा संसद भवनावर पुन्हा मोर्चा – CJP चा इशारा

    आज तोडगा निघाला नाही तर पुन्हा संसद भवनावर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.  आज दुपारी CJP चं शिष्टमंडळ आणि  सरकारची पुन्हा बैठक होणार आहे, आजची ही तिसरी बैठक असून त्यापूर्वी सीजेपीने हा मोठा इशारा दिला आहे.

  • 25 Jul 2026 10:29 AM (IST)

    मुंबईतील 26 जुलैच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची खास पोस्ट

    मुंबईतील 26 जुलैच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी खास पोस्ट केली आहे.  हा ‘तिरंगा मार्च’ आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील – असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 25 Jul 2026 10:23 AM (IST)

    निर्मला सीतारमण मूर्ख बाई आहे – संजय राऊतांची घणाघाती टीका

    निर्मला सीतारमण मूर्ख बाई आहे.  तिला देशाविषयी काय माहिती आहे, तिला काय कळतंय देशाबद्दल, काय भावना आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.

  • 25 Jul 2026 10:08 AM (IST)

    प्रधान असे कोण लागतात की त्यांना वाचवलं जातंय ?- राऊतांचा सवाल

    प्रधान असे कोण लागतात की त्यांना वाचवलं जातंय ? असा सवाल विचारत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावाच लागेल, असं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

  • 25 Jul 2026 10:01 AM (IST)

    पंढरपूर वारीत अवतरला चार्लीन चॅप्लिन

    पंढरपूर वारीत चार्लीन चॅप्लिन अवतरला . सोमनाथ सोभावणे चार्लीन चॅप्लिन वारीत सामाजिक संदेश दिला . शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये व कोणीही व्यसन करु नये याचे कला सादरीकरण केलं.

  • 25 Jul 2026 09:50 AM (IST)

    शरद पवार यांची आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद

    शरद पवार यांची आज दुपारी 4 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे.  शरद पवारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • 25 Jul 2026 09:44 AM (IST)

    दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 27 जुलैला होणार सुनावणी

    दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. आंदोलकांवरील लाठीचार्जविरोधात दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या. पोलीस विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त बळाचा आरोप करत असल्याचा आरोप आहे.

  • 25 Jul 2026 09:32 AM (IST)

    “वारीला जाता येत नसेल तर विठुरायाला स्टेशनवरच भेटा”; टाळ-मृदुंगाच्या गजरात रवींद्र चव्हाण रंगले भक्तिरंगात

    आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेली १२ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही वारकरी, रेल्वे प्रवासी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी टाळ-मृदुंग वाजवत भजनात सहभाग घेत विठ्ठलभक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

  • 25 Jul 2026 09:22 AM (IST)

    CJP संस्थापक अभिजीत दिपके यांना टायफॉईडचं निदान, उपचार सुरू, प्रधानांच्या राजीनाम्याचा मागणीवर ठाम

    CJP संस्थापक अभिजीत दिपके यांना टायफॉईडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आजही सीजपे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असून राजीनामा मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं दिपके यांनी स्पष्ट केलं.

  • 25 Jul 2026 09:18 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवली महत्वाची बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे, आज सकाळी 10 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून उद्याच्या मोर्चाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

  • 25 Jul 2026 09:14 AM (IST)

    जळगावात अनुभूती स्कूलमध्ये पार पडला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा

    जळगावात अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला .  विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी झाले.  दिंडीतन विद्यार्थ्यांकडून विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला तसेच दिंडी, पालखी, नाटिकेतून वारकरी संस्कृतीची ओळख करत विद्यार्थ्यांकडून झाडे लावा, झाडे जगवा’चा हरित संदेश देण्यात आला.  विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.

  • 25 Jul 2026 08:50 AM (IST)

    NEET पेपरफुटी प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या आईचा CJP च्या निदर्शनात सहभाग

    नीट (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या नागपूरच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी यांची आई, नीलम चतुर्वेदी यांनी नागपुरात ‘सीजेपी’ (CJP) द्वारे आयोजित निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. नागपूरच्या संविधान चौकात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण दररोज या आंदोलनात सहभागी होऊ आणि गरज पडल्यास दिल्लीत होणाऱ्या आंदोलनातही सामील होऊ, असे त्यांनी सांगितले.

  • 25 Jul 2026 08:45 AM (IST)

    काँग्रेसचं आज देशभरात कँडल मार्च आणि सत्याग्रह

    काँग्रेस आज देशभरात कँडल मार्च आणि सत्याग्रह आयोजित करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात सर्व राज्य समित्यांना सूचना देणारे परिपत्रक जारी केले आहे. विद्यार्थ्यांशी एकता दर्शवण्यासाठी कँडल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे.

  • 25 Jul 2026 08:42 AM (IST)

    ठाकरे बंधूंचा उद्या मुंबईत मोर्चा

    ठाकरे बंधूंचा उद्या मुंबईत मोर्चा असणार आहे. शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे तसेचराज ठाकरे हेही सहभागी होणार आहेत. सरकारला सुबुद्धी मिळो, सद्बुद्धी मिळो असं साकडं सिद्धीवनायकाला घालण्यात येणार आहे.

  • 25 Jul 2026 08:37 AM (IST)

    तरूणांसोबत संवाद साधणं गरजेचं आहे – सरसंघचालक मोहन भागवत

    तरूणांसोबत संवाद साधणं गरजेचं आहे असं  सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तरूणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. आजची नवी पिढी प्रश्न विचारते, पूर्वी केवळ आज्ञापालनाचा काळ होता, असंही मोहन भागवत यांनी नमूद केलं.

  • 25 Jul 2026 08:35 AM (IST)

    टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपी अटकेत

    अखेर टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.  वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहार मधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    पोलिसांनी गुप्ताला अटक केली असून त्याला भिवंडीला घेऊन येणार आहेत. याप्रकरणी आता पर्यंत 12 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 25 Jul 2026 08:31 AM (IST)

    CJP Protest : CJP चं शिष्टमंडळ आणि सरकारची आज पुन्हा होणार बैठक

    CJP चं शिष्टमंडळ आणि सरकारची आज पुन्हा बैठक होणार असून शिष्टमंडळासोबत सरकारतर्फे आज पुन्हा चर्चा केली जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर  CJP  ठाम आहे. दुपारी 3.30 ला ही बैठक होणार आहे.

  • 25 Jul 2026 08:29 AM (IST)

    CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका करणार स्पष्ट

    शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे. CJP  च्या मागणीनंतर सरकारने आज दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. CJP च्या दोन मागण्यांवर सरकार सकारात्मक असून प्रधानांच्या राजीनाम्याचा मागणीवर तडजोड नाही अशी ठाम भूमिका CJP ने मांडली आहे.

  • 25 Jul 2026 08:25 AM (IST)

    पुण्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

    पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडीच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

    आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम भाविकांनी केलेल्या जयघोषाने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण आहे.

  • 25 Jul 2026 08:22 AM (IST)

    Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा पार पडली.  पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

     

  • 25 Jul 2026 08:13 AM (IST)

    दिल्ली पोलिसांकडून जंतरमंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

    दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसरातील सुरक्षा वाढवली असून, तिथे अतिरिक्त बॅरिकेड्स बसवले आहेत; हे बॅरिकेड्स मजबूत साखळ्यांनी एकमेकांना जोडले गेले आहेत आणि वेल्डिंगद्वारे अधिक बळकट करण्यात आले आहेत.

     

  • 25 Jul 2026 08:12 AM (IST)

    CJP Protest : दिल्लीतील 18 मेट्रो स्टेशन्स आज राहणार बंद

    जंतर-मंतर येथे सुरू असलेलं ‘सीजेपी’ चं (CJP) आंदोलन आणि कडक सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, आज सलग चौथ्या दिवशी सकाळपासून वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत दिल्ली मेट्रोची 18 स्टेशन्स बंद राहतील. या स्थानकांवर प्रवाशांचे येणे-जाणे पूर्णपणे बंद असेल आणि मेट्रो गाड्या तिथे न थांबता पुढे जातील. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक आणि मेट्रो सेवेबाबतची अद्ययावत माहिती तपासावी तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

नवी दिल्लीत जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल उपोषण सोडलं. मात्र CJP चे सस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत सरकार शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काल ( शुक्रवार) संध्याकाळी केंद्र सरकारने सीजेपीच्या शिष्ठमंडळाशी बोलताना दोन मागण्यांवर सकारात्मकता दाखवली. . परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सरकार राजी झाले आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारी २ वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितली असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ता रांका यांनी म्हटले आहे. तर आज पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडलीय. यासह देश-विदेश, राज्य यासह इतर क्षेत्रातील मत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us