AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Jantar Mantar Protest : CJP आंदोलन आणखी तापलं, दिल्ली पोलिसांनीही बंदोबस्त आणखी वाढवला, अचानक नेमकं काय घडलं?

delhi police : दिल्लीतील सीजीपेचं आंदोलन आणखी तापल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

CJP Jantar Mantar Protest : CJP आंदोलन आणखी तापलं, दिल्ली पोलिसांनीही बंदोबस्त आणखी वाढवला, अचानक नेमकं काय घडलं?
| Updated on: Jul 25, 2026 | 1:45 PM
Share

देशाची राजधानी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसराची सुरक्षा वाढवली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या वाढत्या संख्येवरून दिल्ली पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत. बॅरिकेट्स पाडले जाऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खिळे आणि स्क्रू ठोकून लोखंडी पत्रे बसवल्याचे समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या या  सुरक्षेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स लोखंडी साखळ्यांनी बांधले आहेत. दिल्लीचे पोलीस सहआयुक्त विजय सिंह आणि त्यांचं पथक संसदेच्या मार्गावर नजर ठेवून आहेत. परिस्थिती आताही सामान्य आहे. बेरिकेट्स नव्या पद्धतीने फिक्स केले जात आहेत. जयसिंह मार्गाच्या समोर जंतर-मंतर आहे. जयसिंह मार्ग आणि जंतर-मंतरच्या मधल्या मार्गात संसद आहे. त्यामुळे चारी बाजूने बॅरिकेट्स लावून मार्ग रोखला आहे. एका पेक्षा जास्त थरांचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यानंतरही संसदेच्या मार्गाजवळ गर्दी वाढताना दिसत आहे.

पोलिसांची सुरक्षा व्यवस्था पाहिल्यानंतर बॅरिकेट्सचे तीन वेगवेगळे थर लावले आहेत. त्यानंतर या बॅरिकेट्सला लोखंडी साखळीने बांधलं आहे. त्यामुळे हे बॅरिकेट्स लवकर हटवता येणार नाही. या बॅरिकेट्सच्या खाली लोखंडी पत्रे देखील ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांचं उद्दिष्ट काय?

दिल्लीत परिस्थितीत चिघळल्यास आंदोलकांनी अडथळे हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही बॅरिकेट्स हवटले जाणार नाहीत. रस्त्यावरील बेरिकेट्स फिक्स करण्यासाठी अनेक मोठे खिळे ठोकल्याचे दिसत आहे. बॅरिकेट्स खिळे ठोकून घट्ट बसवल्याने आंदोलकांना हटवणे अवघड जाईल, यासाठी पोलिसांनी आधीच योजना आखल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 लागू केला आहे. आजही मेट्रोचे 18 स्टेशन बंद आहेत. आता थेट फूड डिलिव्हरी आणि कॅभ सेवेवरही निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट सायंकाळी 6.30 नंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांच्या निर्बंधावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच