ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू असीम बॅनर्जींचा कोरोनाने मृत्यू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (CM Mamata Banerjee’s younger brother Ashim Banerjee dies of COVID-19)

ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू असीम बॅनर्जींचा कोरोनाने मृत्यू
Mamata Banerjee
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 12:49 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. (CM Mamata Banerjee’s younger brother Ashim Banerjee dies of COVID-19)

असीम यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यांपासून ते रुग्णालयात अॅडमिट होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झालं होतं. आज सकाळीच कोरोना नियमांचं पालन करत निमाताला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असीम हे कालीघाट येथे राहत होते.

ऑक्सिजन लेव्हल कमी झाली

असीम यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला, असं कोलकाताच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकाचे चेअरमन डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं.

रोज शंभरहून अधिक मृत्यू

निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 20 हजार 748 रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यात एकूण दीड लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय राज्यात गेल्या 11 दिवसांपासून 100 हून अधिक रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे. चार दिवसांपूर्वी राज्यात एका दिवसात 138 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 12,993 वर गेली आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चिंताजनक

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरून भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस (Tedros Adnom Ghebreyus) यांनी दिलेल्या माहितीनुसार, WHO कडून कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारताला मदतही दिली जात आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, हजारो ऑक्सिजन केंद्र, मास्क आणि इतर वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ही चिंताजनक आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या, मृत्यूची संख्या वाढत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. (CM Mamata Banerjee’s younger brother Ashim Banerjee dies of COVID-19)

संबंधित बातम्या:

ये पब्लिक है, सब जानती है!, देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, 23 दिवसांपासून व्हेटिंलेटरवर

कोरोना रुग्णांच्या उपचारात गेमचेंजर ठरणार ‘हे’ औषध; लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार

(CM Mamata Banerjee’s younger brother Ashim Banerjee dies of COVID-19)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.