कोरोना रुग्णांच्या उपचारात गेमचेंजर ठरणार ‘हे’ औषध; लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार

पुढच्या आठवड्यात देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे तब्बल 10 हजार डोस उपलब्ध होतील. | DRDO 2 dg drug

कोरोना रुग्णांच्या उपचारात गेमचेंजर ठरणार 'हे' औषध; लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या भारताला आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, एकीकडे नव्या रुग्णांची संख्या स्थिर होत असतानाच आता ऑक्सिजनमुळे (Oxygen shortage) जीव गमावणाऱ्या रुग्णांसाठी 2-DG हे नवे औषध उपलब्ध होणार आहे. (DRDO 2 dg drug 10 thousand doses will launch next week for coronavirus patients)

हे औषध संरक्षण आणि संशोधन विकास संस्था अर्थात DRDO ने तयार केले आहे. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. पुढच्या आठवड्यात देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे तब्बल 10 हजार डोस उपलब्ध होतील.

रुग्ण बरे होण्यासाठी लागणार वेळ कमी

डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.

2 डेक्सोय डी ग्लुकोज कसं घ्यायचं?

डीआरडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या संशोधनाची सुरुवात कधी?

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या लाटेमध्ये INMAS-DRDO च्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचं सहकार्य लाभलं. संशोधनात त्यांना 2 डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. त्याशिवाय हे औषध विषाणूंची वाढ रोखण्याच कामही करतं.
प्रयोगशाळेतील परिणामांच्या आधारवर मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी डीसीजीआयनं परवानगी दिली होती.

क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेत मे ते ऑक्टोबर 2020 या काळात हे औषध सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. त्यासोबतचं रुग्ण बरे होण्यामध्ये या औषधाची सकारात्मक परिणामकारकता दिसून आली होती. दुसऱ्या टप्प्यातील काही चाचण्या 6 रुग्णालयांमध्ये घेण्यात आल्या. त्याशिवाय यानंतर रुग्णालयांची सख्या वाढवण्यात आली. देशातील 11 हॉस्पिटलमध्ये 110 रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचं, डीआरडीओनं सांगितले होते.

संबंधित बातम्या:

स्पुटनिकचा एक डोस हजाराच्या घरात, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची किंमत किती?

(DRDO 2 dg drug 10 thousand doses will launch next week for coronavirus patients)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI