गोव्यात ‘मिडनाईट मर्डर’ सुरुच, विरोधकांचा हल्ला, ऑक्सिजनअभावी आतापर्यंत 83 मृत्यू

Goa Oxygen shortage गोव्यात अक्षरश: मृत्यूचं (Goa corona death) तांडव उभं आहे. ऑक्सिजनअभावी (Goa Oxygen shortage) मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

गोव्यात 'मिडनाईट मर्डर' सुरुच, विरोधकांचा हल्ला, ऑक्सिजनअभावी आतापर्यंत 83 मृत्यू
Goa-medical-college-and-hospital
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 1:12 PM

पणजी : गोव्यात ऑक्सिजनअभावी (Goa Oxygen shortage) मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात अक्षरश: मृत्यूचं (Goa corona death) तांडव उभं आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात  (Goa Medical College and Hospital) गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत  13 तर शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे 8 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे. (Goa oxygen shortage another 13 lost live Over 83 dead in Goas hospital due to Oxygen shortage )

उच्च न्यायालयाने याच विषयावर सरकारला फटकारले असूनही रुग्ण दगावण्याचे सत्र सुरुच आहे. परिणाणी गोव्याचे आरोग्य खाते तोंडावर पडले आहे.

दरम्यान, गोव्यात मिडनाईड मर्डर्स सुरुच आहे, अशी घणाघाती टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली. गोव्यात कालही अनेक मृत्यू झाले. गोव्यातील हे हत्येची मालिका आता थांबायला हवी. गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर द्यायला हवं, असं विजय सरदेसाई म्हणाले.

विजय सरदेसाई यांचं ट्विट 

टँकर रोखल्याने ऑक्सिजन उशिरा पोहोचला?

मेले चेकनाक्यावर गुरुवारी मध्यरात्री प्राणवायूचा वाहतूक करणारा टँकर जास्तवेळ अडवून ठेवल्याने खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदार आडपाईकर या वाहतूक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. कर्नाटकातून येणाऱ्या त्या टँकरने सरकारचा उपकर भरला नाही म्हणून मेले चेकनाक्यावर 20 मिनिटे टँकरला अडवून ठेवण्यात आले होते.

मृत्यूचे सत्र रोखण्यासाठी हॉस्पिटलच्या संकुलात 20 हजार लिटर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन टाकी बसवण्याचे काम सुरू झाले आहे. 16 मे पर्यंत टाकी बसवण्यात येईल आणि 17 मे पर्यंत टाकीत ऑक्सिजन साठवण्याचे काम सुरु होईल.

ऑक्सिजन अभावी मृत्यू

11 मे : 26 रुग्ण

12 मे : 21 रुग्ण

13 मे : 15 रुग्ण

13-14 मे : 13 रुग्ण

14-15 मे : 8 रुग्ण

गोव्यात आतापर्यंत 2 हजार रुग्णांचा मृत्यू

गोव्यात आतापर्यंत एकूण 2 हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा भयावह आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने फटकरल्यानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गोवा सरकारने काय म्हटले आहे? –

1.प्रशिक्षित ट्रॅक्टर ड्रायव्हर नसल्यामुळे सिलिंडर वाहतूक गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात करण्यास व्यत्यय येत आहे. सरकारने कोल्हापूरहून 8 प्रशिक्षित ड्रायव्हर मिळवले आहेत. दोन अतिरिक्त हायपावर ट्रॅक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत.

2. महामारी काळात अॅम्ब्युलन्स आणि शववाहिका दुप्पट आणि कधीकधी तिप्पट दर आकारत असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला होता. या दोन्ही सेवेतील ऑपरेटर्सवर निर्बंध घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

3. केंद्राकडून मिळालेल्या 323 ऑक्सिजन कांसनट्रेटर्स पैकी 263 गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय, फोंडा येथील आयडी इस्पितळ येथे 30, म्हापसा येथील आझिलो इस्पितळात 20 तर डिचोली येथील केशव सेवा साधना संस्थेच्या केंद्रात 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स पुरविल्याचे सरकारने म्हटले आहे. आपल्या घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीही रिकामे सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!

Goa oxygen shortage another 13 lost live Over 75 dead in Goas hospital due to Oxygen shortage

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.