AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM योगी अचानक पोहोचले मूकबधिर शाळेत, मुलांचा आनंद पाहून झाले भावूक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी दुपारी हुमायूनपूर येथील सरकारी मूकबधिर शाळेत शिकणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मुलांना भेटून भावूक झाले.

CM योगी अचानक पोहोचले मूकबधिर शाळेत, मुलांचा आनंद पाहून झाले भावूक
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 18, 2023 | 9:19 PM
Share
गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज गोरखपूरच्या मुक्कामादरम्यान हुमायूनपूर येथील सरकारी मूकबधिर शाळेत शिकणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री योगी यांना पाहून  मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचा हा मनस्वी उत्साह पाहून सीएम योगीही भावूक झाले.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मूकबधिर अपंग मुलांमध्ये भावनांच्या देवाणघेवाणीचे अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या संवादाने या मुलांना भावूक केले. मुख्यमंत्र्यांनीही शब्दांद्वारे संवाद साधला, जो शिक्षकांनी मुलांना चिन्हांद्वारे समजावून सांगितला.

मुलांची भेट घेण्यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांनी लावलेले प्रदर्शन पाहिले. सीएम योगींनी मुलांच्या कौशल्याचे खुलेपणाने कौतुक केले. यावेळी त्यांनी शाळेच्या परिसराची व वर्ग खोल्यांची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

योगी १

दिव्यांग मुलांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘वसतिगृह बांधून या शाळेला निवासी बनवा, यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील दिव्यांग मुलांना मोठा दिलासा मिळेल, त्यांच्या कलागुणांचा विकास होईल, निवासी शाळेत मुलांना सुरक्षित वातावरण मिळेल. 

सीएम योगी म्हणाले की, पूर्वी तिची इमारत जीर्ण होती, सरकारने येथे नवीन इमारत बांधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग असे नाव देऊन त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे काम केले आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!