AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर सीजेपीची कार्यकारिणी जाहीर, दीपकेंकडे कुठलं पद? सौरव दास, आशुतोष रांका, रत्ना सिंह… कुणाला कोणतं पद मिळालं?

CJP Leaders List : कॉकरोच जनता पार्टीने देशभरात संघटन विस्तार करण्याची घोषणा केली आहे. पक्षाने अधिकृतपणे राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहे.

अखेर सीजेपीची कार्यकारिणी जाहीर, दीपकेंकडे कुठलं पद? सौरव दास, आशुतोष रांका, रत्ना सिंह... कुणाला कोणतं पद मिळालं?
CJP Leaders ListImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 06, 2026 | 7:18 PM
Share

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात यश मिळाले होते. यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने देशभरात संघटन विस्तार करण्याची घोषणा केली आहे. पक्षाने अधिकृतपणे राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यस्तरीय समन्वय समित्या आणि लोकसभा मतदारसंघ स्तरावरील समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या नावांव्यतिरिक्त इतर कोणालाही अद्याप पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही अशीही माहिती पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.

CJP राष्ट्रीय कार्यकारिणी

  • संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक : अभिजीत दीपके
  • सहसंयोजक : आशुतोष रांका आणि सौरव दास
  • राष्ट्रीय संघटन प्रभारी : अजिंक्य शिंदे
  • संघटन सहप्रभारी : दीपक बालियान
  • राष्ट्रीय सचिव : आफरीन नवाज
  • मीडिया प्रमुख : विजय रेड्डी मल्लांगी (वय 30 वर्षे)
  • कायदेशीर प्रकरणांचे प्रमुख : रत्ना सिंह
  • रिसर्च अँड पॉलिसी प्रमुख : वैष्णवी गौड
  • तंत्रज्ञान प्रमुख : रोहन देशपांडे
  • वित्त प्रमुख : योगेश इंगळे

CJP चे विभागीय प्रभारी

  • उत्तर विभाग : दीपक बालियान
  • दक्षिण विभाग : विजय रेड्डी मल्लांगी
  • पूर्व आणि ईशान्य विभाग : अंकित भारद्वाज (वय 35 वर्षे)
  • पश्चिम विभाग : योगेश इंगळे

कोअर कमिटीवरून वाद

छत्रपती संभाजीनगर येथे CJP च्या कोअर कमिटीच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला आहे. अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर काही युवकांनी आंदोलन करत पक्षात घराणेशाही आणि पक्षपात होत असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व समन्वयकांना पक्षात प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली. आंदोलनकांनी असा आरोपही केला की, अलीकडे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी फक्त अभिजीत दीपके यांच्या निकटवर्तीयांनाच बोलावण्यात आले, तर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

आंदोलकाच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन एका व्यक्तीचे नसून देशभरातील युवकांचे आंदोलन होते. जंतर-मंतर आंदोलनात सुमारे 450 समन्वयक सहभागी होते, मात्र त्यांना बैठकीत स्थान देण्यात आले नाही. युवकांनी असा आरोपही केला की, पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्याशी रात्री उशिरापर्यंत बैठक आणि आंदोलनासंदर्भात चर्चा झाली, मात्र त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल