AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनून निवडणुका लढणार का? अभिजीत दीपकेने जे काय ठरलय ते सांगून टाकलं

Abhijeet Dipke : आज अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक होत आहे. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये रहायला आहे. पार्टीची पुढच्या रणनिती काय असावी? ते ठरवण्यासाठी अभिजीत दीपकेनी ही बैठक बोलावली आहे.

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनून निवडणुका लढणार का? अभिजीत दीपकेने जे काय ठरलय ते सांगून टाकलं
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 03, 2026 | 12:24 PM
Share

सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. अभिजीत दीपके या तरुणाच्या कल्पनेतून आकाराला आलेला हा पक्ष अवघ्या काही महिन्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सरन्यायाधीशांनी केलेल्या एका टिप्पणीमधून या पक्षाचा जन्म झाला. सुरुवातीला इन्स्टाग्रामवर असलेला हा पक्ष आता रस्त्यावरच्या लढाईत उतरला आहे. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना करणं जे जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. ही कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचं उत्तर या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिलं आहे.

आज अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक होत आहे. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये रहायला आहे. पार्टीची पुढच्या रणनिती काय असावी? ते ठरवण्यासाठी अभिजीत दीपकेनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्याला विचारलं की, कॉकरोच जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार का? त्यावर त्याने सध्या काय ठरलय ते स्पष्टपणे सांगून टाकलं.

या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत…

“मला असं वाटतं की, प्रसारमाध्यमांना जास्त उत्सुक्ता लागली आहे की आम्ही राजकीय पक्ष बनवावा. या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून निराश आहात. आम्हाला ही सामाजिक चळवळच ठेवायची आहे. देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता अजून एक राजकीय पक्ष बनवून काय करणार?” असा सवाल अभिजीतने विचारला.

राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे

“लोकांचा राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे. सकाळी लोक एकाला मतदान करतात, संध्याकाळी सरकार दुसऱ्यापक्षाचं बनलेलं असतं. सकाळी एक आमदार-खासदार बनतो, संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो” असं अभिजीत दीपके म्हणाला. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची संख्या सध्या वाढत चालली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं