Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंसह सीजेपी कार्यकर्त्यांना अटक होणार? एका पोस्टने खळबळ, कोण काय म्हणालं?
अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीच्या कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे. सौरव दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीजेपीने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाआधी पोलिसांकडून अटक होण्याची भीती सीजेपी नेते सौरव दास यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. परंतु सरकारच्या हुकूमशाही वागणुकीला तरुण घाबरणारा नाही. आम्ही असो वा नसो…येत्या 10 ऑक्टोबर रोजी मोठं आंदोलन सुरू होणार आहे, असा इशारा सौरव दास यांनी सरकारला दिला आहे.
सौरव दास यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’ वर पोस्ट करत सरकारला मोठा इशारा दिलाय. दास यांनी म्हटलं की, ‘सरकार मला, अभिजीत, आशुतोष, रत्ना आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या इतर नेत्यांना अटक करण्याची योजना आखत आहे’. कॉक्रोच जनता पार्टीच्या आरोपानंतर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याचबरोबर सौरव दास यांनी याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. सौरव दास यांनी पुढे सांगितलं की, सरकारला वाटत आहे की, त्यांची हुकूमशाही खपवून घेतली जाईल. परंतु त्यांना मोठा गैरसमज होत आहे. युवा पिढी जागृत झाली आहे. तरुणांनी अधिकार आणि भविष्यासाठी संघर्ष कायम ठेवावा. आम्ही तुमच्यासोबत असो या नसो…तुम्ही लढाई सुरू ठेवा. आम्ही जेल किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत. परंतु सरकारला एक चूक महागात पडू शकते. ही तरुण पिढी सहन करणारी नाही’.
🚨URGENT NEWS🚨
The government is planning on arresting me, Abhijeet, Ashutosh, Ratna and other Cockroach Janta Party leaders.
If the government thinks that such dictatorial actions will work, then they are mistakened! The young generation has awakened. We appeal to everyone to continue fighting for our rights and future, with or without us. We have always been ready to face the jail or worse. But this will be a big mistake. The young will not tolerate this.
The protests must continue. People of India should ensure the biggest mobilisation starting October 10th.
@Cockroachisback
— Saurav Das (@SauravDassss) October 4, 2026
सौरव दास यांनी कार्यकर्त्यांना दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, येत्या 10 ऑक्टोबर रोजी एक मोठे आंदोलन सुरू होईल. जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच राहिले पाहिजे’. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील एका रिपोर्टनंतर कॉक्रोच जनता पार्टी आणि विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांकडून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईतील आंदोलनानंतर अभिजीत दिपकेंनी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली’.