AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो आला तेव्हा गल्ली-गल्लीत कॉमेडीच्या कॅसेटचीच धूम होती… नकलांसाठी बच्चन मेन टार्गेट, विनोदाचा बादशहा गेला, वाचा 5 किस्से

राजू श्रीवास्तवने त्याच्या अतरंगी कपड्यांवरही खास स्पष्टीकरण दिलं होतं. तो म्हणाला होता, मी लखनौ-पटनासारख्या शहरांच्या जत्रांमध्ये शो करतो.अशा अतरंगी कपड्यांमुळे लोक मला दुरूनच ओळखतात.

तो आला तेव्हा गल्ली-गल्लीत कॉमेडीच्या कॅसेटचीच धूम होती... नकलांसाठी बच्चन मेन टार्गेट, विनोदाचा बादशहा गेला, वाचा 5 किस्से
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2022 | 12:19 PM
Share

मुंबईः तो आला तेव्हा त्याच्या विनोदाची जणू एक लाटच आली होती. विशेषतः उत्तर प्रदेशात. आला म्हणजे नकलांच्या (Mimicry) माध्यमांतून अॅक्टिव्ह झाला तेव्हाची ही गोष्ट आहे. यूट्यूब, टीव्ही, सीडी आणि डीव्हीडी असं काहीच नव्हतं. होती फक्त ऑडिओ कॅसेट.  पेन्सिलने ती पुढे-मागे करता येत होती. जगात विनोदाचा बादशहा म्हणून तो गाजला. पण त्याला पहिली प्रसिद्धी याच ऑडिओ कॅसेटने मिळवून दिली. नकलाकार, हास्य कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava) याच्या सामान्य कलाकार ते विनोदाचा (Comedy) बादशहा इथपर्यंतच्या प्रवासातले किस्से खूप रंजक आहेत. आज 21 सप्टेंबर रोजी त्याचं निधन झालं. यानिमित्तानं त्यानंच सांगितलेले काही किस्से पाहुयात-

कुणा श्रीवास्तवची कॅसेट निघालीय….

राजू श्रीवास्तवने एका कार्यक्रमातच हा किस्सा सांगितला होता. ‘मी एका रिक्षात बसलो होतो. त्यात माझीच कॅसेट लागली होती. पण ऐकणाऱ्याला मीच तो आहे, हे माहिती नव्हतं. मी म्हणालो, हे बंद करा, काय ऐकताय असलं? तेव्हा तो म्हणाला, अरे नही भैय्या… कोई श्रीवास्तव है, बहुत हँसाता है…

ट्रेनमधला किस्सा पण वाचा…

राजू श्रीवास्तव यांनी ट्रेनमधलाही असाच एक किस्सा सांगितला होता… एकदा ट्रेनमध्ये मी असाच मूडमध्ये होतो. मनोहर पात्रातून शोलेची गोष्ट ऐकवत होतो…. वरच्या बर्थवरचे चाचा झोपेतून उठले. खाली आले. म्हणाले, तू जे हे करतोयस, ते अजून चांगलं कर. थोडी मेहनत कर. त्याची कॅसेट तयार कर. मुंबईला जा. गुलशन कुमारचा स्टुडिओ तिथे आले. त्यांना ऐकव. तुझीही कॅसेट येईल. एका श्रीवास्तवची कॅसेट निघालीय. त्याच्याकडून आयडिया घे….

1963 मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रमेश श्रीवास्तव उर्फ बलई काका यांच्या घरी राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला फिल्मी ताऱ्यांची नक्कल करण्याचा छंद होता. विनोदाच्या दुनियेत त्यानं आतापर्यंत सर्वाधिक नक्कला अमिताभ बच्चनच्याच केल्या असाव्यात.

त्याने विनोदाच्या जगात त्याने प्रसिद्धी मिळण्यासाठी पाऊल ठेवलं तेव्हा युट्यूब, टीव्ही, सीडी, डीव्हीडी काहीच नव्हतं. त्याचं पहिलं कॉमेडी स्केच ‘हंसना मना है’ हे सुद्धा ऑडिओ कॅसेटच्या रुपातच समोर आलं.

कॅसेटचं वर्णन असं केलं होतं…

राजू श्रीवास्तवनेच त्या काळातील कॅसेटचं वर्णन केलं होतं. ‘ त्या काळी एवढे चॅनल नव्हते. फक्त दूरदर्शन होतं. मी त्या काळातला सामान्य माणूस. डीव्हीडी, सीडी काहीच नव्हतं… पेनड्राइव्हही नव्हता…. उस समय हमारे ऑडिओ कॅसेट रिलीज होते थे… जो बीच में फस भी जाते थे, उनमें पेंसिल डालकर ठीक करते थे.. टी सीरीज मे हमारा पहला कॅसेट आया था….

ग्रेट लाफ्टर चॅलेंजमधून लिफ्ट…

राजू श्रीवास्तव 1982 मध्ये मुंबईत आला. सुरुवातीला त्याने त्याने ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याला फक्त १०० रुपये मानधन मिळालं होतं.

सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून त्यानं काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘बाजीगर’ ते ‘बॉम्बे टू गोवा’, ‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या’ यासारख्या चित्रपटातही काम केलं.

पण द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली. लोक त्याच्या विनोदांची लाट आली. त्याचे किस्से पाहता पाहता लोकप्रिय झाले.

अतरंगी कपड्यांवर काय म्हणाला होता?

राजू श्रीवास्तवने त्याच्या अतरंगी कपड्यांवरही खास स्पष्टीकरण दिलं होतं. तो म्हणाला होता, मी लखनौ-पटनासारख्या शहरांच्या जत्रांमध्ये शो करतो. तिथं खूप गर्दी असते. अशा अतरंगी कपड्यांमुळे लोक मला दुरूनच ओळखतात. लोकांनी चोटी कलाकार म्हणावं म्हणून मी चोटी ठेवलीय, असंही त्यानं सांगितलं होतं….

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.