मोठा ट्वि्ट! मला ज्ञानेश कुमारांचा मेसज….; आंदोलनाआधीच राहुल गांधींचा गौप्यस्फोट
राहुल गांधी यांनी आंदोलनाआधीच धक्कादायक दावा केला आहे. ज्ञानेश कुमार यांनी मेसेज केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मेसेज येतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्लीतील आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत निवणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. तर त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘हो, मला मेसेज येतात. ती ही पत्रकार परिषद पाहत आहेत’. ज्ञानेश कुमारांच्या मेसेजला काय प्रत्युत्तर दिलं, यावर राहुल गांधी म्हणाले, त्यांना म्हटलो की, साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे. तुम्ही मुख्य गुन्हेगार नाही. तुमची चुकी नाही. एकच सोपी गोष्ट करा. राजीनामा द्या. मार्गातून बाजूला व्हा. कोणताही त्रास होणार नाही. तेव्हा आम्ही माफी मागण्याचा विचार करू शकतो. तुमचा राजीनामा ही देशसेवा ठरेल’ .
राहुल गांधींचा धक्कादायक दावा
राहुल गांधी यांनी सांगितले की, ‘इंडिया आघाडीचे नेते हे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. आम्ही संविधान वाचवण्याची तयारी सुरू ठेवणार आहे’. यावेळी त्यांनी दिल्ली सुरक्षा व्यवस्थेवरूनही केंद्र सरकावर निशाणा साधला. दिल्ली येणार्यांना रोखलं जात आहे. लोकांना बस आणि ट्रेनमधून उतरवलं जात आहे. दिल्लीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की,दिल्लीतील आंदोलन 5 दिवसांपासून सुरू आहे. परंतु आमचा सरकारचा वर्षांपासून विरोध करत आहे. सरकारला आंदोलकांना दिल्लीत येऊ देत नाही. त्यांची रस्त्यात अडवणूक केली जात आहे, असा आरोप केला. विरोधक म्हणून आमची रणनीती वेगळी आहे दिल्लीत मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. याचा संदेश देशभरात गेला पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
