उद्या मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल

| Updated on: Dec 24, 2020 | 12:33 PM

कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. (Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan)

उद्या मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल
Follow us on

नवी दिल्ली: कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारे हे सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहे. उद्या जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. (Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना देऊन कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाहीत. त्यांच्याविरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही तर केवळ भाजपचं किंवा संघाचंच नुकसान होणार नाही, तर संपूर्ण देशाचं नुकसान होणार आहे, असं सांगतानाच केवळ चारपाच उद्योगपतींसाठीच हे सरकार काम करत आहे. म्हणूनच मोदींविरोधात जे कोणी उभे राहतात त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. आज शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवलं जातंय. उद्या मोहन भागवतही मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं. गेल्या 29 दिवसांपासून शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देश हे पाहत आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत हे शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. (Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan)

संयुक्त अधिवेशन घ्या

संसदेत कोणतीही चर्चा न करता कृषी कायदा मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा करताना शेतकऱ्यांशी साधी चर्चाही करण्यात आली नाही. पण शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ संयुक्त अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा, असं सांगतानाच सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास त्याविरोधात विद्रोह करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. (Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan)

 

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, कार्यकर्त्यांची धरपकड; प्रियांका गांधी ताब्यात

LIVE : सरकारच्या विरोधात प्रियांका गांधी रोडवर बसल्या आंदोलनाला

राहुला गांधींच्या पायी मार्चला परवानगी नाकारली; दिल्लीत कलम 144 लागू

राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?

(Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan)