अंदाज घेतला, चाचपणी केली.. आता पक्षावर राज करण्यासाठी मुख्यमंत्री पदाला मारणार लाथ..

| Updated on: Sep 22, 2022 | 6:49 PM

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही अशोक गेहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार की पद सोडणार

अंदाज घेतला, चाचपणी केली.. आता पक्षावर राज करण्यासाठी मुख्यमंत्री पदाला मारणार लाथ..
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याने त्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) अर्ज भरणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. एकीकडे अध्यक्षपदासाठी अर्ज आणि दुसरीकडे ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडायलाही तयार झाले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, जर कोणी काँग्रेस अध्यक्ष बनला तर तो राज्याचा मुख्यमंत्री कसा होणार असही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अधिसूचना जाहीर केली गेली आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षात आता खळबळ माजली आहे. या शर्यतीत आतापर्यंत फक्त अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांचीच नावं समोर येत होती. मात्र आता मनीष तिवारी आणि दिग्विजय सिंह यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

अशोक गेहलोत सध्या केरळमध्ये आहेत. तिथे ते सध्या राहुल गांधींची भेट घेत असून त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारीही दर्शवली आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी निवडणुका होतात की नाही तेही बघितले पाहिजे. यावेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी मी इच्छूक असलो तरीही राजस्थानच्या राजकारणापासून मला दूर व्हायचे नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले आहेत. येथे ते राहुल गांधी यांची भेट घेत असून त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत. या बैठकीत गेहलोत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी राहुल यांचे मन वळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही अशोक गेहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार की पद सोडणार अशी आता जोरदार चर्चा सुरु आहे.

यावर त्यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही निवडणूक लढवू शकतो. पण संपूर्ण देशात काम करून पदाला न्याय द्यावा लागणार आहे.

या परिस्थितीत दोन पदांवर काम करता येणार नाही. गेहलोत काँग्रेस अध्यक्ष झाल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणार असल्याचाही राजकीय अर्थ लावला जात आहे.