ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एल्गार, काँग्रेसच्या रॅलीत CJP नंतर नेहा बोरा, ध्रुव राठी जाणार?
Congress Ramlila Maidan Rally: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने पुन्हा एल्गार पुकारला आहे. 1 नोव्हेंबर रोजी रामलिला मैदानावर मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सीजेपी, नेहा बोरा आणि ध्रुव राठीही सहभागी होणार का?

Congress CJP Neha Bora Dhruv Rathee: मुख्य निडवणूकआयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत महाआंदोलन होत आहे. 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर हे आंदोलन होईल. काँग्रेस, इंडिया आघाडी उद्या शक्तीप्रदर्शन करणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर त्याचवेळी सीजेपी नेते, डाव्या विद्यार्थी चळवळीतील नेत्या नेहा बोरा आणि युट्यूबर ध्रुव राठी यांनी मोठे आवाहन केले आहे. हे तीनही नेते या रॅलीत सहभागी होणार आहेत का?
अभिजीत दिपके आणि नेहा बोरा सहभागी होणार?
CJP नेते अभिजीत दिपके यांनी या महारॅली आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या या आंदोलनात सहभागी होतील की नाही याविषयीचे चित्र आज स्पष होईल. तर विद्यार्थी नेता नेहा बोरा ही उद्याच्या काँग्रेस महाआंदोलनात सहभागी होणार आहे. तिने सोशल मीडियावरून याविषयीची माहिती दिली आहे. यामुळे काँग्रेस या आंदोलनात सर्वांना सहभागी करून घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
ध्रुव राठीचा पाठिंबा
काँग्रेससोबत अनेक मुद्यांवर पटत नसले तरी या छोट्या-छोट्या कारणांचा कोणताही फरक पडत नाही, असे म्हणत युट्यबर ध्रुव राठी यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. इंडिया ब्लॉकच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 1 नोव्हेंबर रोजी आंदोलन होत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्याने केले आहे. पण तो या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे 1 नोव्हेंबर रोजी मोठे आंदोलन होत आहे. रामलीला मैदानावरील आंदोलनाला परवानगी मिळाली आहे. यामुळे चिंतेचा कोणताही विषय नाही. हा लोकशाहीसाठीचा लढा आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन ध्रुव राठी याने केले आहे. दरम्यान या महाअंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनात विरोधी पक्षांचे खासदार आणि राज्या राज्यातील नेते हजर राहणार आहेत. काल राहुल गांधी यांना मॉक पार्लमेंटचं आयोजन केले होते.