AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु प्यायली की नाही ? आता ब्रेथ एनालायझर नव्हे, तर हा पुरावा ठरणार महत्वाचा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार ( NFHS-6 ) भारतात दरवर्षी १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे १८.९ टक्के पुरुष आणि १.१ टक्के महिला मद्यप्राशन करतात. ग्रामीण भागात २०.६ टक्के पुरुष आणि शहरी क्षेत्रात १५.५ टक्के पुरुष दारु पितात.तर महिलांमध्ये ग्रामीण भागात १.४ टक्के आणि शहरात ०.५ टक्के असा आकडा आहे.

दारु प्यायली की नाही ? आता ब्रेथ एनालायझर नव्हे, तर हा पुरावा ठरणार महत्वाचा
breathing analyzer
| Updated on: Jul 10, 2026 | 5:51 PM
Share

पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत एखाद्या चालकाने दारु प्यायली आहे की नाही हे ठरवताना ब्रेथ एनालायझर टेस्ट केली जाते. त्यानंतर चालकाला दंड फर्मावला जात असतो. मात्र, आता बिहार हायकोर्टाच्या एका निकालाने पोलिसांच्या या मोहिमेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने बिहारमधील एका प्रकरणात केवळ ब्रेथ एनालायझरची टेस्ट आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी नाही. त्याऐवजी आता रक्त वा युरिन टेस्ट सारखे पुरावे महत्वाचे असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. भारतात दारु पिणे ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणात किती केस दाखल होतात हे पाहूयात..

पाटणा हायकोर्टाने सांगितले ?

बिहार येथे दारुबंदी कायदा लागू आहे. मोतीहारी येथील एका पोलिस कर्मचाऱ्याला नोकरीवरुन निलंबित केल्याचे प्रकरण कोर्टात आले होते. पोलिसांने त्याने मद्यसेवन केले नसल्याचे सांगत आपण औषध प्यायलेलो होतो. त्यामुळे तोंडातून दारुचा वास येत होता. या प्रकरणाची सुनावणी घेताना हायकोर्टाने सांगितले की केवळ ब्रेथ एनालायझर मशिनच्या रिपोर्ट आधार हे सिद्ध होऊ शकत नाही की एखादा व्यक्ती दारु प्यायलेला आहे. कोर्टाने सांगितले की दारु प्यायल्याचे सिद्ध करण्यासाठी ब्लड किंवा युरिनची टेस्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे या पोलिसाला बडतर्फ करण्याचा आदेश कोर्टाने रद्द केला.

कोर्टाने ब्रेथ एनालायझरला पुरावा का मानले नाही ?

पाटणा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने जुन्या निकालात म्हटले आहे की ब्रेथ एनालायझरची रिडींग नेहमी अचूक नसते. अनेक वेळा अल्कोहोल युक्त कफ सिरफ, माऊथवॉश, काही औषधे वा मशिन योग्यवेळी कॅलिब्रेशन न झाल्याने चुकीचे रिडींग देखील होऊ शकते. केवळ मशिनच्या आकड्यांआधारे कोणा व्यक्तीला दोषी ठरवणे वा त्याविरोधात कठोर कारवाई करणे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात मानले जाईल. त्यामुळेच मेडिकल तपासणीचाच जास्त विश्वसनीय आणि निर्णायक पुरावा मानला आहे.

भारतात किती लोक दारु पितात ?

भारताचा जगातील सर्वात मोठ्या दारुचा खप असणाऱ्या देशात समावेश आहे. सामाजिक न्याय आणि व्यवहार मंत्रालयाच्या २०१९ च्या अहवालानुसार देशात १० ते ७५ वयोगटातील सुमारे १६ कोटी लोक दारु पितात. तर अन्य काही अंदाजानुसार ही संख्या १६ ते १८ कोटी इतकी आहे. मंत्रालयानुसार सुमारे २.९ कोटी लोक मद्याच्या आहारी गेले आहेत. देशात प्रति व्यक्ती दारुची विक्री सुमारे ५.७ लिटर आहे. IWSR आणि बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच संस्थेच्या रिपोर्टनुसार भारत जगात तयार होणाऱ्या एकूण व्हिस्कीच्या सुमारे ५० टक्के हिस्सा रिचवतो.

ब्रेथ एनालायझर कसे काम करते ?

ब्रेथ एनालायझर एक पॉर्टेबल इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ज्याचा वापर एखाद्याच्या शरीरात किती अल्कोहोल आहे याचे प्रमाण मोजण्यासाठी आहे.जेव्हा एखादा व्यक्ती मशिनीत फूक मारतो तेव्हा त्याची फुप्फुसातून निघणारा श्वास मशिनच्या सेंसरपर्यंत पोहचते. श्वासात उपस्थित इथेनॉलचे कणांच्या आधारावर मशिन डिजिटल रिडींग देते. ज्यामुळे ब्लड अल्कोहोल कंसट्रेशन म्हणजे बीएसीच्या रुपात दाखवला जातो. याच कारणामुळे पोलिसांनी रस्त्यावर ड्रंक एण्ड ड्राईव्ह मोहिमेत या मशिनचा वापर करते. कारण या मशिनमध्ये काही सेंकदात रिझल्ट मिळतो.

ब्रेथ एनालायझर बंद होणार का?

याचा अर्थ ब्रेथ एनालायझरचा वापर बंद होणार नाही. पोलिस रस्त्यांवर ड्रंक एण्ड ड्राईव्ह मोहिमेत ब्रेथ एनालायझर मशीनचा वापर करतील. मात्र, याच्या अहवालाला अंतिम पुरावा मानला जाणार नाही. या मशिनने दारु प्यायल्याचा दुजोरा मिळाला, त्यानंतर मेडिकल तपासणी, डॉक्टरांचा अहवाल, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि वैज्ञानिक पुराव्यांची साक्ष पाहिली जाईल. म्हणजे ब्रेथ एनालायझरचा वापर आताही केला जाणार आहे, मात्र दंड आणि शिक्षा करताना केवळ ब्रेथ एनालायझरच्या अहवालाला अंतिम पुरावा मानला जाणार नाही.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु