Marriage : लग्नात कोट्यवधी खर्च, 25 लाखांचा हुंडा… पहिल्याच रात्री नवऱ्याची ‘ती’ विचित्र अट ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली

Marriage : लेकीच्या लग्नात आई - वडील मोठा खर्च करतात. अशात मुलीचा सुखी संसार सुरु असेल तर, त्यांना कसली काळजी नसते. पण काही चुकीचं घडलं तर, मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी होते. आता देखील असंच काही घडलं. पहिल्याच रात्री नवऱ्याची 'ती' विचित्र अट ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली.. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

Marriage : लग्नात कोट्यवधी खर्च, 25 लाखांचा हुंडा... पहिल्याच रात्री नवऱ्याची ती विचित्र अट ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली
| Updated on: Oct 07, 2026 | 2:10 PM

Marriage : लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील फार मोठा टप्पा असतो. लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरु झालं पाहिजे, असं आई – वडिलांना वाटतं. पण असं घडलं नाही आणि लेकीला सासरी त्रास होत असेल तर सर्वात जास्त दुःख हे आई – वडिलांना होत असतं. आता देखील असंच काही घडलं आहे. वडिलांनी लेकीच्या लग्ना कोट्यवधी रुपये खर्च केले आणि 25 लाख रुपयांचा हुंडा देखील दिला. पण तरी देखीस सासरची मंडळी तिला सतवत राहिली… ही धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोप असे आहेत की, हुंडा दिल्यानंतर देखील सासरच्या कुटुंबियांकडून सतत पैसांची मागणी होत होती. एवढंच नाही तर, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने बायकोकडे एक विचित्र अट ठेवली, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला. संबंधित प्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण?

Loading...

पीडित महिलेने केलेल्या आरोपांनुसार, तिचं लग्न 20 एप्रिल 2026 मझ्ये झालं होतं. ज्यासाठी 18 ते 21 एप्रिल पर्यंत JR ग्रँड रिसोर्टमध्ये डेस्टिनेशन वेडिंग ठेवण्यात आलेली. आरोप असे देखील आहेत की, लग्न सुरु असताना सासरच्या मंडळींनी 25 लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी ती अट पूर्ण देखील केली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीने तिला सांगितले की, त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीने त्याची फसवणूक केली होती; त्यामुळे, आता त्याने अशी इच्छा व्यक्त केली की, तिने त्याच्या एका मित्रासोबत त्याच्याच उपस्थितीत लैंगिक संबंध ठेवावेत. तिने विरोध करूनही, त्याने तिला तसे करण्यास सतत आग्रह केला.

पीडितेने आरोप केले की, तिच्या नणंदेने तिचा पासवर्ड टाकून मोबाईल अनलॉक केला आणि त्यात असलेली तिची वैयक्तिक व कंपनीशी संबंधित माहिती कॉपी केली. त्यानंतर ती तरुणी कामावर रुजू होण्यासाठी बंगळुरू येथे निघून गेली. तिथे तिचा पती देखील पोहोचला आणि त्याने तरुणीच्या मोबाईलमधून व कंपनीच्या लॅपटॉपमधून वैयक्तिक चॅट्स, कंपनीची गोपनीय माहिती आणि सहकार्‍यांशी संबंधित डेटा आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर केला आणि नंतर व्हॉट्सॲप चॅट्स डिलीट केली.

आरोप आहे की, आता पती त्याच डेटाच्या आधारे तिला बदनाम करण्याची धमकी देत ​​आहे. पिडीतेने पोलिसांकडे चोरीला गेलेला डेटा हस्तगत करण्याची आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना सांगितल्यानुसार, तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु असल्याचं सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us