AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid Update: कोरोनाने पुन्हा वाढवलं टेन्शन, केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरिएंट

25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेलेल्या भारतीय प्रवाशामध्ये कोविड 19 चा JN.1 संसर्ग पहिल्यांदा आढळून आला. यानंतर केरळमधील एका महिलेमध्ये याची लक्षणे आढळून आली आहेत. विद्यमान लसी या सर्व प्रकारांपासून संरक्षण प्रदान करण्यात प्रभावी ठरतील. यानंतरही आरोग्य विभाग सतर्क आहे.

Covid Update: कोरोनाने पुन्हा वाढवलं टेन्शन, केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरिएंट
coronavirus
| Updated on: Dec 16, 2023 | 9:33 PM
Share

Corona Update : कोरोना पुन्हा एकदा चिंता वाढवू लागला आहे. कारण केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी कोविड-19 चे उप-प्रकार JN.1 चे प्रकरण नोंदवले गेले आहे. आरटी पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. या महिलेमध्ये फ्लूसारखी सौम्य लक्षणे दिसत होती.

सिंगापूरमधून संसर्ग तामिळनाडूत पोहोचला

सूत्रांचे म्हणणे आहे की सध्या भारतातील ९० टक्के कोविड प्रकरणे खूपच कमकुवत आहेत. बहुतेक पीडित घरीच क्वारंटाईन आहेत. यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीयामध्ये JN.1  हा उपप्रकार आढळला होता. तो तामिळनाडूच्या त्रिचुरापल्लीचा रहिवासी आहे. 25 ऑक्टोबर रोजी ते सिंगापूरला गेले होते. संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर, त्रिचुपल्ली किंवा तमिळनाडूमधील इतर कोणत्याही ठिकाणी कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.

भारतात JN.1 उप प्रकाराचे इतर कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. JN.1 सबवेरियंट प्रथम लक्झेंबर्गमध्ये ओळखला गेला. यानंतर ते जगातील इतर ठिकाणी पसरले. त्यात स्पाइक प्रोटीनमध्ये लक्षणीय प्रमाणात उत्परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे, ज्यामुळे संसर्ग वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्तीला फसवण्याची क्षमता वाढते.

या सर्व प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी सध्याची लस प्रभावी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर, पिरोला प्रकार आणि उप-प्रकारांची आतापर्यंत 3,608 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी बहुतेक युरोप आणि उत्तर अमेरिकेतून पुढे आली आहेत. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात एका दिवसात 339 नवीन कोविड-19 संसर्गाची नोंद झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 1,492 वर पोहोचली आहे.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.