स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कोरोना हद्दपार होऊन सर्वांना आरोग्याचे अमृत लाभो; रामदास आठवलेंच्या शुभेच्छा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 15, 2021 | 5:44 PM

संविधानातील समतावादी भारत साकार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कोरोना हद्दपार होऊन सर्वांना आरोग्याचे अमृत लाभो; रामदास आठवलेंच्या शुभेच्छा
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानातील समतावादी भारत साकार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संविधानिक मूल्यांच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होत राहिल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. (Corona should banished and everyone Get better health; Ramdas Athawale wishes Independence Day)

नवी दिल्लीतील सफदर जंग रोड येथील शासकीय निवासस्थानी रामदास आठवले यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवले आदी उपस्थित होते.

सध्या देशात आणि संपूर्ण जगात कोरोनाचा कहर झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कोरोनाचा विखार नष्ट होऊन सर्वांना आरोग्याचे अमृत लाभो, अशा शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलाय यावेळी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो, गो कोरोना गो’ चा नारा पुनश्च एकदा दिला आहे.देशात वंचित घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध आहे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

भर पावसातही नवी मुंबईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भर पावसात नवी मुंबई परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका कार्यालये, सिडको, कोकण भवन, एपीएमसी, शाळा, सोसायट्या, महाविद्यालये अशा सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी काळजी घेऊन काम करावं आणि शासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन करावं.

देशातील वास्तुरचनेचा आकर्षक नमुना असलेल्या आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात तळमजल्यावर महापालिका आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये राज्यात नेहमीच अव्वल राहिली आहे. यापुढील काळात अधिक चांगले काम करून देशातही नंबर वन होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केलं. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वच्छता शपथेच्या अनुषंगाने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता व जागरूकता वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेला स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करुया, असं आवाहनही बांगर यांनी केलं आहे.

इतर बातम्या

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही

(Corona should banished and everyone Get better health; Ramdas Athawale wishes Independence Day)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI