
देशात वेळोवेळी तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस येत असतात, परंतु गुजरातमधील सुरत विमानतळावर अलिकडेच घडलेल्या तस्करीच्या एका प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्था आणि वाढत्या तस्करी नेटवर्कबद्दल नव्याने चिंता निर्माण झाली आहे. दुबईहून परतलेल्या एका जोडप्याकडे तब्बल २० किलोपेक्षा जास्त सोने सापडले आहे.हे सोने ज्या प्रकारे लपवून आणल्याचे उघड झाले आहे त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परदेशातून सोने किंवा अंमली पदार्थांची तस्करी काही नवीन नाही. परंतू आता एअरपोर्टवर एका जोडप्याची सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. या जोडप्याने सोन्याला वितळवून त्याची पेस्ट बनवून शरीराच्या मध्य भाग आणि शरीरावर असे लपवून आले होते की बाहेरील कपड्यांवरुन ते सहज दिसू नये अशी व्यवस्था केली होती. महिलाच्या शरीरावर १६ किलो आणि पुरुषाच्या जवळ १२ किलो सोन्याचा लेप लावला होता, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
अलिकडच्या काही वर्षांत महिलांचा तस्करीसाठी सर्वाधिक वापर केला जात आहे. याचे एक मोठे कारण हे आहे की महिला प्रवाशांची तपासणी ठराविक मर्यादेपर्यंत होते. तस्करीचे नेटवर्क आता या बाबीला समजून योजनाबद्ध पद्धतीने महिलांना पुढे आणले जात आहे.
या कारवाईने केवळ सुरत एअरपोर्टच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला नसून हे ही सिद्ध झाले आहे की तस्करी कोणत्या लेव्हलला जाऊन केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सुरत विमानतळावर घडलेले हे आतापर्यंत सर्वात मोठे सोने तस्करीचे प्रकरण आहे.
हा प्रकार केवळ तस्करीचा प्रकार नसून या एका सामाजिक आणि प्रशासकीय आव्हान देखील आहे. येथे सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे या अशा गुन्ह्यांमागे नेहमी संघटीत गुन्हेगारीचा महत्वाचा रोल असतो. या प्रकारे संघटीत टोळ्या या देशातील आणि देशाबाहेरील असामाजिक संघटना आणि दहशतवादी गटाशी जुळलेल्या असतात.