प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, बेदम मारहाण करुन लग्न लावलं!

पाटणा (बिहार) : आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांचं जबरदस्तीने लग्नही लावण्यात आलं. बिहारमधील झाझा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बिहारमधील बोडवा गावातील ही घटना असून याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेला कित्येक दिवस उलटल्यानंतरही पोलिस प्रशासन मात्र दोषींवर कोणतीही कारवाई करताना …

प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, बेदम मारहाण करुन लग्न लावलं!

पाटणा (बिहार) : आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांचं जबरदस्तीने लग्नही लावण्यात आलं. बिहारमधील झाझा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

बिहारमधील बोडवा गावातील ही घटना असून याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेला कित्येक दिवस उलटल्यानंतरही पोलिस प्रशासन मात्र दोषींवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

नेमकं प्रकरण काय?

बोडवा गावात राहणाऱ्या एका मुलीचे शेजारच्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. हे दोघेही अल्पवयीन असून गुरुवारी एका ठिकाणी ते फिरायला गेले होते. फिरत असताना काही गावकऱ्यांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर गावकरी त्यांना जाब विचारु लागले. मात्र त्या युगुलाने गावकऱ्यांची माफी मागितली. परंतु गावकऱ्यांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांना सोडून न देता त्या दोघांची गावात धिंड काढण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे बाल विवाह प्रतिबंधक कायद्यालाही न जुमानता गावकऱ्यांना त्या प्रेमी युगलाचे लग्न लावून दिले. दरम्यान सध्या या प्रेमी युगलला मारहाण करताना आणि लग्न लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेला कित्येक दिवस उलटून गेले आहेत. असे असतानाही जवळचे झाझा पोलिस प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *