घरातून पळालेल्या जोडप्याचं पोलिस स्थानकातच शुभमंगल

लखनौमधील मनिष आणि किरण हे दोघंही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांपासून सुरक्षा तर पुरवलीच, शिवाय दोघांचा विवाहही लावला.

Couple Ties Knot in Police Station, घरातून पळालेल्या जोडप्याचं पोलिस स्थानकातच शुभमंगल

लखनौ : लखनौ महिला पोलिस स्थानकाला सोमवारी मंगल कार्यालयाचं स्वरुप आलं होतं. कारण घरातून पळून आलेल्या जोडप्याचं पोलिस स्थानकातच लग्न लावण्यात (Couple Ties Knot in Police Station) आलं.

उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मनिष आणि किरण यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मात्र किरणच्या कुटुंबीयांचा दोघांच्या लग्नाला ठाम विरोध होता. त्यामुळे किरण घरातून पळाली आणि मनिषच्या घरी राहायला आली.

किरणचे कुटुंबीय रागाच्या भरात आपल्या जीवाचं काही बरंवाईट करतील, अशी भीती किरणला होती. किरण आणि मनिषने लखनौ पोलिस आयुक्तालयात धाव घेतली.

किरणच्या कुटुंबापासून सुरक्षा मिळावी, अशी मागणी दोघांनी पोलिसांकडे केली. दोघंही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी दोघांना सुरक्षा तर पुरवलीच, शिवाय दोघांचा विवाहही लावला. महिला पोलिस स्टेशन प्रभारी शारदा चौधरी यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार हे लग्न लावल्याची माहिती (Couple Ties Knot in Police Station) आहे.

हेही वाचा : ललितकुमारला जोडीदार सापडली, लिंगबदल झालेला बीडचा कॉन्स्टेबल विवाहबंधनात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *