भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

| Updated on: Jan 11, 2021 | 7:51 AM

कचरा करण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, महाराष्ट्रातील देशातील सर्वाधिक 3,587 टन कचरा जमा झाला आहे.

भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
Follow us on

नवी दिल्ली : भारतात गेल्या सात महिन्यात तब्बल 33 हजार टन कोव्हिड-19 जैव-वैद्यकीय कचरा (COVID-19 Waste) निर्माण झाला आहे. कचरा करण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, महाराष्ट्रातील देशातील सर्वाधिक 3,587 टन कचरा जमा झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रणमंडळाने (Central Pollution Control Board) जारी केलेल्या आकड्यांमधून ही माहिती पुढे आली आहे. पूर्ण देशात ऑक्टोबर या एका महिन्यात तब्बल 5,500 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली आहे (COVID-19 Waste).

राज्यांच्या प्रदूषण मंडळांनी दिलेल्या आकड्यांवरुन जून 2020 मध्ये सर्व केंद्र शासित प्रदेशात तब्बल 32,994 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली आहे. ज्याची 198 सामान्य जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट केंद्रांद्वारे एकत्रिकरण, शोध आणि विल्हेवाट लावली जात आहे.

सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात

कोव्हिड-19 जैव-वैद्यकीय कचऱ्यात पीपीई कीट, मास्क, बुटांचे कव्हर, हॅण्ड ग्लोव्ह्ज, मानव ऊतक, रक्ताने माखलेल्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे. डाटानुसार, महाराष्ट्रात जूनमध्ये सात महिन्यात 5,367 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली.

कुठल्या राज्यात किती कचरा?

केरळ – 3,300 टन

गुजरात – 3,086 टन

तामिळनाडु – 2,806 टन

उत्तर प्रदेश – 2,502 टन

दिल्ली – 2,471 टन

पश्चिम बंगाल – 2,095 टन

कर्नाटक – 2,026 टन

सीपीसीबीने मे महिन्यात कोरोना विषाणूसंबंधित जैव वैद्यकीय कचरा जमा करणे आणि इलेक्ट्रॉनिक मॅनिफेस्ट सिस्टमद्वारे डेटा संकलित करण्यासाठी ‘कोव्हिड- 19 बीडब्ल्यूएम’ मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केला गेलं. या अॅपच्या माध्यमातून कोव्हिृ-19 कचऱ्याचा शोध घेवून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जातं.

COVID-19 Waste

संबंधित बातम्या :

कचरा टाकण्यावरुन वाद, धारदार शस्त्राने तीन भावांकडून तरुणाची हत्या

कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट, कोल्हापुरात महिलेचा होरपळून मृत्यू

कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना