कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट, कोल्हापुरात महिलेचा होरपळून मृत्यू

सॅनिटायझर पेटून झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या सुनीता काशीद यांना प्राण गमवावे लागले. Kolhapur Lady sanitizer blasts

कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट, कोल्हापुरात महिलेचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर : सॅनिटायझरची बाटली पेटल्यामुळे स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सॅनिटायझरमुळे आग लागून गेल्या आठवड्यात 40 वर्षीय महिला होरपळली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात हा दुर्दैवी प्रकार घडला होता.  त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणारे सॅनिटायझर हाताळताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. (Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)

कोल्हापूर जिल्ह्यामधील बोरुडे गावामध्ये, रविवार 27 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजता सुनिता काशिद या घरातील कचरा अंगणात पेटवत होत्या. त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा अचानक स्फोट होऊन सॅनिटायझर त्यांच्या अंगावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या ऐंशी टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या.
घरातील आणि शेजारी लोकांनी आग विझवून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.गेले आठवडाभर त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. ग्रामसेवक धोंडीराम काशिद यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दीर, भावजय असा मोठा परिवार आहे. सुनिता काशीद यांच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार धुवावे, सॅनिटायझर वापरावा, असे आवाहन अनेक वेळा केले जाते. मात्र ते वापरताना केलेली हलगर्जी जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.

नाशिकमधील महिलेचाही दुर्दैवी मृत्यू

मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझेशन करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचाही जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले होते. नाशिक शहरातील वडाळा गावात ही दुर्दैवी घटना घडली होती. (Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)

वीज पुरवठा खंडित झाल्याने रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्याचा दावा केला जात होता. या अपघातात रजबीया 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

संबंधित बातम्या :

मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

(Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI