AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG गॅस धारकांना सर्वात मोठा झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय, नवा नियम आजपासूनच लागू, टेन्शन वाढलं

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतामध्ये गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

LPG गॅस धारकांना सर्वात मोठा झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय, नवा नियम आजपासूनच लागू, टेन्शन वाढलं
cylinderImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 9:57 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे.  होर्मूज स्ट्रेट बंद झाल्यामुळे सध्या जागातील अनेक देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज असते, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक या मार्गेने होते. तर भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची आणि इंधनाची गरज आहे, त्यातील सुमारे 40 टक्के वाहतूक या मार्गाने होते. दरम्यान मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे आखाती देशातील होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. याचा फटका हा इतर देशांप्रमाणेच भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे.

गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल चालकांवर सध्या हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच घरगुती वापराच्या गॅससाठी देखील नागरिकांवर आता लाईन लावण्याची वेळ आली आहे.  यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकारकडून लक्ष ठेवलं जात असून, नागरिकांना सुरळीत गॅस सिलिंडरचा पुरवठा कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर आात केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे.

ज्यांच्या घरात पाइपद्वारे  नैसर्गिक गॅस (PNG) चा पुरवठा होतो, अशा नागरिकांना आता घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाहीये. ‘ज्यांच्याकडे PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन आहेत,  त्यांनी LPG कनेक्शन तात्काळ परत करावे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. तसेच   ‘PNG कनेक्शन असलेल्या व्यक्तींना LPG सिलिंडर रिफिल देखील आता मिळणार नाहीये. हा आदेश आजपासून लगेच लागू करण्यात आला आहे.

टेन्शन वाढलं

दरम्यान जिथे अद्याप पीएनजी गॅस पोहोचलेला नाही, अशा लोकांना एलपीजी गॅसचा नियमित आणि सुरळीत पुरवठा व्हावा, हा या निर्णयामागे सरकारचा हेतू आहे. मात्र अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांच्या नावे पीएनजी आणि एलपीजी असे दोन्ही कनेक्श आहेत. जर पीएनजी गॅस पुरवठ्यामध्ये काही समस्या निर्माण झाली तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या घरात एलपीजीचं सिलिंडर देखील आणून ठेवलं आहे. मात्र आता सरकारच्या नव्य आदेशामुळे यातील कोणतंही एकच कनेक्शन वापरता येणार असल्यानं अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल