AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Arnab Alert : वर्षातलं पहिलं महाभयंकर वादळ धडकणार? 2 राज्यांना मोठा अलर्ट, रात्रीच…

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदाचं पहिलं वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने सरकत आहे. 'अर्नब' असं संभाव्य नाव असलेल्या या चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांत अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अलर्ट जारी झाला आहे.

Cyclone Arnab Alert : वर्षातलं पहिलं महाभयंकर वादळ धडकणार? 2 राज्यांना मोठा अलर्ट, रात्रीच...
Cyclone Arnab AlertImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 2:05 PM
Share

बंगालच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर हवामानात बदल होत असल्याने देशातील दोन महत्त्वाच्या राज्यात वादळ येण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत मोठा दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. या वादळाचा परिणाम आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांवर अधिक होणार आहे. दोन्ही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशातील या वर्षातील हे पहिलं वादळ असणार आहे.

बंगालच्या खाडीत तयार झालेली सिस्टिम खोल दाबाच्या श्रेणीत येते. त्यामुळेच चक्रीवादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असं झालं तर या वादळाचं नाव अर्नब ठेवलं जाणार आहे. वादळ कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशातील सात जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयएमडीने वादळाबाबतची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

सर्वाधिक परिणाम कुठे?

आयएमडीच्या अंदाजानुसार, बुधवारी म्हणजे आज सिस्टिम पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकू शकते. 23 सप्टेंबरच्या रात्री विशाखापट्टणम आणि गोपालपूरच्या दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाला हे वादळ पार करू शकतं, असं आयएमडीने मह्टलं आहे.

या सिस्टिमचा सर्वाधिक परिणाम ओडिशात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ओडिशाच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. गंजम कलेक्टर व्ही कीर्ती वासन यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम्ही दिवसा अनेक सायक्लोन सेंटरला जाऊन आलो. तिथली तयारी पाहिली. तसेच नागरिकांना हवामानाच्या अंदाजाची माहिती दिली आहे.

यावेळी मुख्य सचिव अनु गर्ग यांनीही मीडियाशी संवाद साधला. हवामान खात्याने हवामानात मोठा बदल होणरा असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण वादळाचा अंदाज वर्तवला नव्हता. सरकारने राज्याच्या किनाऱ्या लगत आणि दक्षिण क्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी कर्मचारी आणि मशिनरी तैनात ठेवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. यावेळी हवेचा वेग कमी असणार आहे. त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं गर्ग म्हणाले.

अलर्ट जारी

दक्षिण ओडिशाच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबरपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी कोरापुट, गजपती आणि गंजाममध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कालाहांडी, नबरंगपूर, कोरापूट आणि मलकानगिरीसाठी सुद्धा 24 आणि 25 सप्टेंबर या दोन दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसात ओडिशात ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्याचा हा वेग ताशी 75 किलोमीटर वेग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आंध्रप्रदेशावरही मोठा परिणाम

कमी दबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा आंध्र प्रदेशातील किनारी भागालाही मोठा फटका बसणार आहे. सिस्टिम विशाखापट्टणम आणि गोपालपूरजवळून जाईल. सध्या राज्यात चक्रीवादळाचा संभाव्य धोका पाहता मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. मंत्री व्ही, अनिता यांनी अधिकाऱ्यांसोबत कंट्रोल रुममध्ये बैठका घेण्यास सुरुवात केली असून वादळाच्या शक्यतेवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Follow Us
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप