मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट

Cyclone Maila : पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. या वादळाचा भारतावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर... भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
Cyclone Maila
Image Credit source: Google
| Updated on: Apr 09, 2026 | 4:06 PM

जगावर मैला चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे, यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. हे वादळ एखाद्या देशाच्या किनाऱ्याला धडकल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना भारतीय हवामान विभागाने सविस्तर माहिती दिली आहे.

भारताला किती धोका?

भारतीय हवामान विभागाने मैला चक्रीवादळाबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की हे चक्रीवादळ भारतापासून खूप दूर आहे. असं असलं तरीही देशातील काही भागांमध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. दक्षिण भारतात वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे, तसेच काही भागात उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भारताला थेट चक्रीवादळाचा धोका नसला तरी हवामान अस्थिर होण्याची शक्यता आहे.

मैला चक्रीवादळाचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होणार?

मैला हे घातक चक्रीवादळ सध्या पॅसिफिक महासागरातील सोलोमन समुद्राच्या भागात सक्रिय आहे. ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांच्या दरम्यान तयार झालेले चक्रीवादळ घातक ठरण्याची शक्यता आहे. याला श्रेणी 3 किंवा 4 चे चक्रीवादळ मानले जात आहे. या वादळाच्या आसपास वाऱ्याचा वेग सुमारे 195 किमी प्रति तासपर्यंत पोहोचत आहे. मात्र हे भारतापासून हजारो किलोमीटर दूर असल्याने भारतीय किनाऱ्यांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाही.

काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

IMD ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुढील काही दिवसांत कोणतेही चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता नाही. याचाच अर्थ भारताच्या सागरी किनाऱ्यांना या वादळाचा फारसा धोका नाही. असं असलं तरी हवामान पूर्णपणे शांतही नाही, कारण इतर स्थानिक प्रणाली सक्रिय आहेत. 9 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. या भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे. हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 ते 44 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us