Cyclone Remal | ‘रेमाल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम, आता काही तासांत धडकणार तुफानी चक्रीवादळ

Cyclone Remal Live Updates: 'रेमाल' चक्रीवादळबाबत आयएमडीने 26 आणि 27मे रोजी अलर्ट दिला आहे. परंतु हा अलर्ट 28 मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वेळोवेळी चक्रीवादळामुळे निर्माण होणारी परिस्थिती पाहून हवामान विभागाकडून माहिती देण्यात येणार आहे.

Cyclone Remal | रेमाल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम, आता काही तासांत धडकणार तुफानी चक्रीवादळ
Cyclone Remal
| Updated on: May 26, 2024 | 8:28 AM

Cyclone Remal Live Updates: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमाल’ बाबत भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. ‘रेमाल’ चक्रीवादळ सध्या सागर बेटांच्या दक्षिण पूर्वेस सुमारे 290 किमी अंतरावर आहे. बांगलादेशमधील खेपुपारापासून 300 किमी अंतरावर आहे. तसेच दक्षिण पूर्वेस आणि पश्चिम बंगालच्या उत्तर उपसागरावर कॅनिंगपासून 320 किमी दक्षिण पूर्वेस आहे. येत्या सहा तासांत या चक्रीवादळाचे रुपांतर भयंकर वादळात होणार आहे. त्यानंतर 26 मेच्या रात्री बंगालादेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे वादळ दाखल होणार आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस आणि अतिवेगवान वारे वाहणार आहे. यामुळे रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे 26-27 मे रोजी 80 ते 100 किमी प्रतीतासाने वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार आहे.

कोणकोणत्या भागात होणार वादळाचा परिणाम

‘रेमाल’ चक्रीवादळ 22 मे रोजी बंगालच्या उपसागरात सुरु झाले. सध्या तो मध्य बंगालच्या उपसागरात आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल तसेच त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहू शकतात. महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाही. तसेच केरळ आणि कर्नाटकमधील किनारी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

कोलकाता विमानतळ बंद

चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. यामुळे कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डन रद्द करण्यात आले आहे. या विमानतळावर जाणाऱ्या/येणाऱ्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. कोलकाता विमानतळ 26 मे रोजी दुपारी 12 ते 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत कोलकात्याला जाणाऱ्या/येणाऱ्या विमानांची उड्डाने रद्द केली आहे.

‘रेमाल’ चक्रीवादळबाबत आयएमडीने 26 आणि 27मे रोजी अलर्ट दिला आहे. परंतु हा अलर्ट 28 मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वेळोवेळी चक्रीवादळामुळे निर्माण होणारी परिस्थिती पाहून हवामान विभागाकडून माहिती देण्यात येणार आहे.