लैंगिक गुन्हेगारासोबत दलाई लामा यांचं खास कनेक्शन? फोटो आणि व्हिडीओ समोर येताच म्हणाले…

Dalai Lama: अनेक अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लैंगिक गुन्हेगारासोबत दलाई लामा यांचं खास कनेक्शन? अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर असं स्पष्टीकरण दिलं ज्यामुळे..., प्रकरणामुळे वादग्रस्त परिस्थिती..

लैंगिक गुन्हेगारासोबत दलाई लामा यांचं खास कनेक्शन? फोटो आणि व्हिडीओ समोर येताच म्हणाले...
Dalai Lama
| Updated on: Feb 09, 2026 | 9:45 AM

Dalai Lama: एपस्टीन फाइल अशा प्रसिद्ध आणि दिग्गज लोकांनी नावे समोर आली आहेत, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एपस्टीन फाइलमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना, दलाई लामा यांच्या कार्यालयातून अधिकृत विधान जारी केलं आहे. तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संबंधांबद्दल सांगणाऱ्या सर्व मीडिया रिपोर्ट फेटाळण्यात आले आहेत. सांगायचं झालं तर, अनेक माध्यमांनी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) च्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटलं आहे की, दलाई लामा यांचं नाव बहुचर्चित एपस्टाईन फाइल्समध्ये 169 वेळा आलं आहे. पण तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा याच्या कार्यालयाकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण…

काही रिपोर्टनुसार, बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा यांचं नाव अनेक वैयक्तिक ईमेलमध्ये आणि ‘मसाज फॉर डमीज’ नावाच्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आढळल्याचा आरोप आहे. ज्यामुळे खळबळ माजली आहे. यावर दलाई लामा यांच्या कार्यालयातून अधिकृत विधान जारी करत सर्व चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत…

याच दाव्यांची चर्चा होत असताना दलाई लामा यांच्या कार्यालयाने अधिकृत वक्तव्य जारी करत, कोणासोबत कोणताही संबंध नाही… असं स्पष्ट केलं आहे. ‘एपस्टाईन फाइल्स’शी संबंधित काही मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट दलाई लामा यांना जेफ्री एपस्टाईनशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत… पण आम्ही विश्वासाने सांगू शकतो की, लामा कधीच जेफरी एपस्टीन याला भेटले नाहीत. एवढंच नाही तर, लामा यांनी कधीच त्यांच्याकडून कोणाला जेफरी याला भेटायला पाठवलेलं नाही. शिवाय कोणार यासाठी परवानगी देखील दिली नाही.

काही रिपोर्टनुसार ऑक्टोबर 2912 मधील ईमेलचा उल्लेख केला आहे ज्यात तिबेटी आध्यात्मिक नेते आणि एपस्टाईन यांच्यातील बैठकीचं वर्णन केलं आहे. त्यात असंही सूचित केलं आहे की, दलाई लामा त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याची अपेक्षा होती.

एवढंच नाही तर, युरोपियन मीडिया आउटलेट नेक्स्टा टीव्हीने असा दावा केला आहे की, दलाई लामाचे अनुयायी असल्याचे व्यक्ती एपस्टाईनला भेटले असावेत, ज्यामुळे इनडायरेक्ट लिंकच्या चर्चांना आणखी बळकटी मिळाली.

Follow Us