AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार होते, बारामतीच्या होस्टलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या संदर्भात काही नेत्यांकडून मोठे दावे देखील करण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

होय अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार होते, बारामतीच्या होस्टलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 6:18 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. सध्या विलिनीकरणाची चर्चा नाही. परंतु अजितदादा असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, तशी त्यांनी मला कल्पना दिली होती, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी देखील मोठा दावा केला आहे. महायुतीमधून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजित पवार यांचा प्लॅन होता, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अतुल लोंढे यांच्या या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असताना, काल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की अजितदादा हे महायुतीमधून बाहेर पडणार होते, होय हे खरं आहे, असं लवांडे यांनी म्हटलं आहे.  19 जानेवारी 2026 ला मी स्वतः आमदार रोहित पवार यांच्यासोबत पुण्यातील बारामती होस्टेल येथे अजितदांदासोबत चर्चा केली होती.

स्वतः अजितदादा यांनी सांगितलं होतं की, आपलं फार काळ भारतीय जनता पार्टीबरोबर जमनार नाही,  कारण तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.  2028 ला आपण बाहेर पडणार आहोत, एकत्रित आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे अजित पवार यांचे शब्द होते. अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला कंटाळले होते त्यांच्या,  कारभाराला कंटाळले होते ते यातून बाहेर पडणार होते हे सत्य आहे, असं लवांडे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान लवांडे यांच्या दाव्यामुळे आता विलीनीकरणाच्या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

Follow Us
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा