
पोलीसांची ड्युटी म्हणजे तारेवरची कसरत. कारवाई करावी तर राजकारण्यांची नाराजी झेलायची, नाही केली तर कोर्टाचा बडगा अशा दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडलेले पोलीस नेहमीच सॉफ्ट टार्गेट ठरत आलेले असतात. असा एका पोलीसांनी त्यांच्या बॉसला डीसीपींना सिव्हील ड्रेसमध्ये ओळखले नाही. आणि ड्रंक एण्ड ड्रायव्हींग मोहिमेत त्यांनाच पकडले तसेच त्यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट केली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे संबंधित डीसीपींनी त्यांचा गौरव केला आहे.
चंदीगड येथील पंचकुलाच्या डीसीपी सृष्टी गुप्ता सध्या खूपच चर्चेत आहेत. त्या देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी अलिकडेच जिल्ह्यातील पोलिस चौक्यांची अचानक रात्री पाहणी केली. यावेळी सृष्टी गुप्ता यांनी ड्रंक एण्ड ड्राईव्ह मोहिमेचा आढावा घेतला. तपासणी दरम्यान, सिव्हील ड्रेसमध्ये असलेल्या सृष्टी गुप्ता या खाजगी वाहन चालवत असताना त्यांची तपासी ड्यूटीवरील पोलिसांनी केली. विशेष म्हणजे आपल्या बॉसची आपण तपासणी करीत आहोत याची यत्किचिंतही कल्पना या पोलिसांना नव्हती. त्यांनी ड्रायव्हींग सिटवर बसलेल्या महिला अधिकाऱ्याची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेतली. त्यानंतर या पोलिसांनी कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान त्यांनी केला. पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे कौतूक डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी केले आहे.
पोलीसांनी दाखवलेल्या कर्तव्य दक्षतेबद्दल डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले आहे. सन्मान केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांत एसपीओ धर्मवीर आणि एसपीओ सुरजीत सिंग यांचा समावेश होता. त्यांनी तपासणी नाक्यावर सतर्कता दाखवल्यामुळे आणि जलद कारवाई केल्यामुळे अवैध दारू जप्त करण्यात आली. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची तपासणी केल्याबद्दल होमगार्ड्स प्रवीण कुमार, किशन सिंग आणि मोहित कुमार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला आहे. रस्ते आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना या मोहिमेमुळे चांगली जरब बसली आहे.पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे ही मोहीम यशस्वी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.