Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?

Deepti Chaurasia Death Case : प्रसिद्ध उद्योजक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. दीप्ती आणि तिचा पती वेगळे का राहत होते याचे कारण समोर आले आहे.

Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?
Deepti Chaurasia Death case
| Updated on: Nov 26, 2025 | 5:34 PM

कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कमला पसंद आणि राजश्री या आघाडीच्या आणि मोठ्या पान मसाला कंपन्या आहेत. याचे उत्पन्नही खूप जास्त आहे. मात्र तरीही दीप्ती आणि हरप्रीत हे जोडपं वेगवेगळ्या घरामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नव्हतं अशी माहिती समोर आली आहे. दीप्ती यांच्या आत्महत्येनंतर पोलीसांनी एक सुसाईड नोट आणि एक डायरी जप्त केली आहे. यातील माहितीने खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेले आहे?

दीप्ती यांच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कोणाच्याही नावाचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र यातून दीप्ती आणि पतीमध्ये असलेल्या वादाची माहिती समोर आली आहे. दीप्ती यांनी लिहिले आहे की, ‘जर नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर त्या नात्यात राहण्याला आणि जगण्याला काय अर्थ आहे?’ यातून दीप्ती या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते अशी माहिती समोर येत आहे.

पतीचे दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत दुसरे लग्न!

दीप्ती यांचा पती हरप्रीत चौरसियाने दुसरे लग्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. हरप्रीतची दुसरी पत्नी दक्षिण भारतीय अभिनेत्री असल्याचीही माहिती समोर आली आहे. याच दुसऱ्या लग्नामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता या घटनेनंतर, दीप्तीच्या नातेवाईकांनी हरप्रीत चौरसियावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

पोलीसांकडून तपासाला सुरूवात

दीप्ती यांच्या आत्महत्येनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. दीप्ती या वैयक्तिक ताणतणावात किंना मानसिक ताणतणावाने ग्रस्त होती का याचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीसांनी कुटुंबातील सदस्यांचे आणि ओळखीच्या लोकांचे जबाब नोंदवले आहेत. आता पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.