गुंतवणूक धोरणासाठी निर्णायक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचं FIEO कडून जोरदार समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच महत्त्वपूर्ण देशांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला 15 मे पासून सुरुवात होणार आहे. 15 मे ते 20 मे असा 6 दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याचं एफआयइओकडून जोरदार समर्थन करण्यात आलं आहे.

गुंतवणूक धोरणासाठी निर्णायक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचं FIEO कडून जोरदार समर्थन
Prime Minister Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 8:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच महत्त्वपूर्ण देशांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला 15 मे पासून सुरुवात होणार आहे. 15 मे ते 20 मे असा 6 दिवसांचा हा दौरा असणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आपल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिराती, स्वीडन, इटली, नॉर्वे आणि नेदरलँड या पाच देशांना भेट देणार आहेत. भारताने नुकताच युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापारी करार (FTA) केला आहे, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जागतिक पातळीवर भारताचं वाढतं महत्त्व आणि आर्थिक संबंधाच्या दृष्टीकोणातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सन (FIEO) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 मे पासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात आहेत, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, स्वीडन, इटली, नॉर्वे आणि नेदरलँड या पाच देशांचा समावेश आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या व्यापार आणि गुंतवणूक धोरणासाठी हा एक निर्णायक क्षण असल्याचं एफआयइओने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना एफआयइओचे अध्यक्ष एस. सी. राल्हन यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर होत आहे. या दौऱ्यामुळे आखाती देश आणि युरोपीयन राष्ट्रांसोबत असलेले भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होणार आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, हा दौरा एक विश्वासार्ह जागतिक आर्थिक भागीदार म्हणून भारताची वाढत असलेली प्रतिष्ठा अधोरेखित करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामुळे अभियांत्रिकी, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, औषधनिर्माण, संरक्षण उत्पादान आणि डिजिटल व्यापार या प्रमुख क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

युई हा आखाती देश भारताच्या सर्वात महत्त्वाच्या व्यापार आणि गुंतवणूक भागीदारांपैकी एक आहे. युई हे मध्यपूर्व आणि आफ्रिकन देशांसोबत होणाऱ्या भारतीय निर्यातीसाठीचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असलेला युईचा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असं एफआयइओचे अध्यक्ष एस. सी. राल्हन यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामुळे भारताला तब्बल 70 अब्ज डॉरच्या व्यापाराचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्ती केली आहे.

Follow Us