AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदार अडचणीत सापडला; कार्यकर्त्याला बेदाम मारहाण अन् जातीय शिवीगाळ केली, गुन्हा दाखल

भाजप आमदार अडचणीत सापडला आहे. भाजप नेत्याने कार्यकर्त्याला बेदाम मारहाण आणि जातीय शिवीगाळ केल्याचा देखील आरोप आहे. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार अडचणीत सापडला; कार्यकर्त्याला बेदाम मारहाण अन् जातीय शिवीगाळ केली, गुन्हा दाखल
bjp mlaImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 2:06 PM
Share

दिल्लीतील भाजप आमदार गजेंद्र सिंह दराल हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पक्षातील अनुसूचित जाती वर्गातील नेते सुनील कुमार यांना कार्यालयात कोंडून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुनील यांच्यावर अंगावर मारहाणीचे वळ दिसत आहेत. मारहाणीने अंग काळं-निळं पडलं आहे.

गजेंद्र सिंह दराल हे भाजपमधून पहिल्यांदा मुंडका विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी ते मुंडका वार्ड क्रमांक 35 मधील नगरसेवक देखील राहिले आहेत. त्याचबरोबर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दिल्लीतील भाजपच्या महत्वाच्या पदावरही काम केलं आहे. दराल यांनी 2025 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार जसबीर कराला यांचा जवळपास 10 हजार मतांनी पराभव केला होता. सुनील कुमार यांच्या आरोपासहित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने दराल यांना नोटीस पाठवली आहे. भाजपने या नोटीसच्या माध्यमातून उत्तर मागितलं आहे.

कांझवाला मंडळाचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या तक्रारीनंतर कांझवाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, ‘आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2) , 127(2),140(3), 351(2),61(2),3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दराल यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे.

सुनील कुमार यांच्या आरोपानुसार, भाजप कार्यालयात मारहाण आणि जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर कुमार यांना गुरुवारी सायंकाळी मतदार यादीवर चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलावलं. याच कार्यालयात दराल आणि इतर त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली. कार्यालयाचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. कार्यालय बंद केल्यानंतर पाइप, लाठी, पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सुनील कुमार यांच्या दाव्यानुसार, त्यांना रात्रभर कार्यालयात डांबून ठेवलं होतं. तसेच घटनेवेळी सीसीटीव्ही व्हिडिओ देखील बंद केले होते.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक