Delhi Blast: दिल्लीचा स्फोट हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग, संरक्षण तज्ज्ञांनी केले सावध

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलशी बोलताना हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असे म्हटले आहे.

Delhi Blast: दिल्लीचा स्फोट हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग, संरक्षण तज्ज्ञांनी केले सावध
abhay patwardhan
| Updated on: Nov 11, 2025 | 8:21 PM

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांना ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घ्यायचा आहे, त्यामुळे ते उतावीळ झालेले आहेत. पाकिस्तानने तिथल्या सिनेट बिल पास करुन पाकिस्तानचे आर्मी चीफ मुनीर यांना पूर्ण अधिकार दिले आहेत. फिल्ड मार्शल म्हणून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी त्यांच्या हाताखाली राहिल याची तरतूद केली आहे.त्याचे एकछत्री अंमल राहण्यासाठी हा बदल केला आहे. तो घेतील तो निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपती बदलू शकणार नाहीत. त्यांना न्यूक्लिअर अटॅक करण्याची मूभा देखील देण्यात आली असून ही घटना खूप मोठी असल्याचेही संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.

दिल्ली ब्लास्टमध्ये अजूनपर्यंत तपास प्राथमिक पातळीवर सुरु आहे. या मागे कोणती संघटना गुंतलेली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे कृत्य कोणत्या संघटनेचे आहे हे सिद्ध झालेले नाही. ब्लास्टचं कनेक्शन जैश-ए- मोहम्मदपर्यंत पोहचलेले नाही. हा मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचाही भाग असू शकतो असा गर्भित इशारा संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी दिला आहे.

ISIS आणि ISIS खुरासान या आशियामधली अतिरेकी संघटना आहेत.साधारणतः आठ दहा दिवसांपूर्वी या संघटनांनी कश्मीरच्या सगळ्या दहशतवादी संघटनांना या संघटनांनी कॉल दिला होता,त्यांना ISIS च्या छत्राखाली एकत्र यायला सांगण्यात आले आहे. त्यांना कश्मीर आणि भारतात कुरापती वाढवण्यासाठी एकत्र यायला सांगण्यात आले आहे अशी माहिती असल्याचे संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी दिली आहे.

 भारताचा बदला घ्यायचा आहे

मुनीर यांना आपल्या भारताचा बदला घ्यायचा आहे. ते पाकिस्तान आर्मीचे जनरल असताना त्यांनी कश्मीरच्या पहलगामचा हल्ला केला होता आणि आपण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला जो काही मार दिला आहे, त्याचा त्यांना आता बदला घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा आंतरराष्ट्रीय कट आहे असं मला वाटतं. ज्याप्रमाणे हे तिन्ही डॉक्टर काश्मीर आणि पुलवामाचे आहेत. पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा 40 जवान मारले गेले होते.या तिन्ही डॉक्टरने चीनमध्ये जाऊन एमबीबीएसची डिग्री घेतली आहे. मग त्यांनी चीनमध्ये राहून आपली प्रॅक्टिस का करू नये? पण त्यांनी प्रॅक्टिस न करता भारतात वेगवेगळ्या राज्यात जाऊन, त्यांनी आपले काम सुरू केले आणि त्यांच्याकडून ज्याप्रमाणे स्फोटकं, आरडीएक्स,एके 47 रायफल सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हे मॉड्युल कसं काय निर्माण झालं हा एक मोठा प्रश्न आहे.

भारताला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न

हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा मोठा भाग आहे, ते भारताला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना पूर्ण लढाई करायची नाही. 2012 नंतर हा पहिल्यांदा इतका मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला आहे असेही अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे. भारताची ज्याप्रमाणे प्रगती सुरू आहे, त्याला खीळ बसावी आणि गोंधळ निर्माण व्हावा. यासाठी हा बॉम्ब ब्लास्ट केला असावा अशी शक्यता वर्तवली जात असल्याचे संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे, त्यांच्याशी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी संवाद साधला आहे.