अतिरेक्यांचा अड्डा, डॉ.आदिल याच्या अटकेनंतर सहारनपुर पुन्हा चर्चेत, याआधी किती अतिरेकी पकडले ?
दिल्लीच्या बॉम्बस्फोटाआधी गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील सहारनपूरात डॉ.आदिल याला AK-47 सह अनेक संशयास्पद वस्तूंसह पकडण्यात आले. याचे कनेक्शन दिल्ली स्फोटांशी आहे का ? याचाही तपास सुरु आहे.आधीही सहारनपूरात अनेक अतिरेकी सापडले आहेत.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून श्रीनगर पोलिसांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरीला असलेल्या डॉ. आदिल अहमद राठर याला अटक केले आहे. त्याने श्रीनगरात अतिरेकी संघटना जैश-ए-महम्मदची पोस्टर्स लावल्याचा आरोप आहे. अटक करताना त्याच्याकडे एके-४७ रायफल, अनेक इलेक्ट्रॉनिक डिवाईस आणि संशयित चॅट रेकॉर्ड सापडले आहे. तपासात डॉ. आदिल अहमद राठर हा हरियाणा आणि अन्य राज्यातील सक्रीय मोठ्या नेटवर्कशी संबंधित असू शकतो असा पोलिसांना संशय आहे.
उत्तरप्रदेशातील सहारनपूरचे हे पहिलेच अतिरेकी कनेक्शन नाही. गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, इंडियन मुजाहिदीन आणि AQIS सारख्या संघटनांशी संबंधित लोकांना अटक झाली आहे.
2018 मध्ये जैश-ए-मोहम्मदचा नदीमला अटक
साल २०१८ मध्ये जैशचा संबंधित नदीम याला गंगोह परिसरातून अटक झाली होती. तपासात कळले की तो पाकिस्तान स्थित हँडलर्सच्या संपर्कात होता. आणि जम्मू-कश्मीरच्या जैशच्या मॉड्युलसाठी काम करत होता. त्यानंतर सहारनपूरच्या देवबंदमधून जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचा(JMB) सदस्य तल्हा याला अटक झाली. तल्हा हा भारतात कट्टरपंथी संघटनांच्या कारवाया पसरवण्यात गुंतला होता.
लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी इनामुल आणि हिजबुल मुजाहिदीनचा सदस्य उल्फत हुसैन उर्फ सैफुल याला देखील सहारनपुर येथून अटक झाली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये जैशशी संबंधित शाहनवाज तेली आणि आकिब यांच्या अटकेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष या क्षेत्राकडे गेले. दोन्ही काश्मीर युवक सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये भाड्याने रहात होते. आणि त्यांच्याकडे अनेक संशयास्पद सामुग्री सापडली.
NIA आणि ATSची संयुक्त कारवाई
सहारनपूर येथील संबंधित अनेक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि उत्तर प्रदेश एण्टी टेररिस्ट स्क्वॉडने मिळून कारवाई केली आहे.नजीर अहमद, एजाज शेख आणि बिलाल खान यांच्यावर अतिरेकी कट, फंडीगं आणि तरुणांना भडकवल्या प्रकरणाचे आरोप लावण्यात आले होते. सप्टेंबर २०२५ मध्ये तितरों-नकुड निवासी बिलाल खान याला झालेली अटक मोठे यश मानले गेले. बिलाल खान अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) संघटनेशी संलग्न होता आणि त्याचा पाकमधील हँडलरशी संपर्क होता. तपासात प.युपीत काही भागात स्लीपर सेल सक्रीय असल्याचे उघडकीस आले होते.
ATS चे कमांड सेंटर स्थापन
सहारनपूरमध्ये वाढत्या अतिरेकी कारवाया पाहाता युपी सरकारने २०२२ मध्ये देवबंदमध्ये एटीएस कमांड कंट्रोल सेंटर स्थापन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार हे सेंटर स्थापन केले गेले. हे सेंटर पश्चिम युपीचा स्ट्रॅटेजिक नर्व्ह हब आहे. येथील टीम सहारनपुर, मुजफ्फरनगर, शामली आणि हरिद्वारमध्ये संदिग्ध नेटवर्कवर नजर ठेवत असते. ही स्थानिक पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो आणि एनआयएसोबत मिळून संयुक्त कारवाई आणि माहितीचे अदानप्रदान करण्याचे काम करते.
डॉ.आदिल अहमद याला गेल्या गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोड आहेत. तपास यंत्रणा याचे धागेदोरे तपासत आहेत. दिल्ली लाल किल्ल्या जवळील बॉम्ब स्फोटातही आदिल याचे कनेक्शन आहे का ? याचा तपास पोलिस करत आहेत.
