CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात

CJP Protest : शनिवारी उपोषणाच्या 20 व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात कारवाई केली. सोनम वांगचूक यांना उचलून थेट रुग्णालयात दाखल केलं. तिथेही त्यांचं उपोषण सुरु आहे. सोनम वांगचूक यांच्या पत्नी डॉ गीतांजली आंग्मो या आता आंदोलनात उतरल्या आहेत.

CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात
Gitanjali Angmo
| Updated on: Jul 20, 2026 | 10:58 AM

दिल्लीत जंतर-मंतर परिसरात वातावरण तापलं आहे. हजारो आंदोलक तिथे जमा झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोनम वांगचूक सध्या रुग्णालयात आहेत. पण अजूनही त्यांनी उपोषण सोडलेलं नाही. शनिवारी उपोषणाच्या 20 व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात कारवाई केली. सोनम वांगचूक यांना उचलून थेट रुग्णालयात दाखल केलं. तिथेही त्यांचं उपोषण सुरु आहे. सोनम वांगचूक यांच्या पत्नी डॉ गीतांजली आंग्मो या आता आंदोलनात उतरल्या आहेत. “आमचं लक्ष मार्चवर असेल. आज तीन मुद्दे महत्वाचे आहेत. सर्वप्रथम आमचा शांततेत मार्च काढण्याचा प्रयत्न असेल. आपण शिक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करु. देशासाठी ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्या सतर्क राहिलं पाहिजे” असं गीतांजली आंग्मो म्हणाल्या.

सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरु केलं. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.दरम्यान सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबद्दल हेल्थ अपडेट आली आहे. सोनम वांगचूक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांकडून लाठीचार्ज

दरम्यान दिल्लीत आंदोलनस्थळी आज मोठा गोंधळ पहायला मिळाला. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलक अजिबात मागे हटायला तयार नव्हते. विरोधी पक्षांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांसोबत जे सुरु आहे, त्यावर जोरदार टीका केली आहे. हा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय असं विरोधकांचं म्हणणं आहे.

Follow Us