काळजी घ्या..! कोरोना उद्या तुमच्याही गावात पसरू शकतो; दिल्लीत परिस्थिती भयानक

| Updated on: Apr 15, 2023 | 11:22 PM

दिल्लीत कोरोनाचे रुग्णसंख्या वाढल्याने 4 कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले, तर कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा 4 हजार 600 पार झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

काळजी घ्या..! कोरोना उद्या तुमच्याही गावात पसरू शकतो; दिल्लीत परिस्थिती भयानक
Follow us on

नवी दिल्ली : देशाच्या राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण गेल्या 24 तासामध्ये 1 हजार 396 रुग्णांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग दर आता 31.9 टक्के झाला आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनामुळे 5 रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य विभाग आता आणखी सतर्क झाला आहे.

गेल्या 24 तासांपासून दिल्लीत कोरोनाचे एकूण 4 हजार 376 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 1 हजार 71 रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनाचा आलेख वाढता असल्याने दिल्लीत सध्या 4 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.

याआधी 14 एप्रिल रोजी कोरोनाविषयी जास्त काही जाहीर करण्यात आले नव्हते, मात्र 13 एप्रिल रोजी कोरोनाचे 1 हजार 527 नवीन रुग्ण आले होते. त्यावेळी संसर्गाचे प्रमाण वाढून 27.77 टक्के झाले आहे, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी, कोरोनाचे 1 हजार 149 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा संसर्ग दर आता 23.8 टक्के झाला होता.

दिल्लीत कोरोनाचे रुग्णसंख्या वाढल्याने 4 कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले, तर कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा 4 हजार 600 पार झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीतील वाढत्या कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून 4 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्याच बरोबर दिल्लीत कोरोनाचे एकूण 4 हजार 631 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 2 हजार 977 होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून 258 रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

यापैकी 93 रुग्ण अतिदक्षता विभागात, 66 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर तर 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये शनिवारी 130 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 62 रुग्ण बरे झाले असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.