Delhi Fire Video : दिल्लीतल्या आगीतून जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, आगीत 26 मृत्युमुखी, अरविंद केंजरीवारांनी केला व्हिडिओ ट्विट

| Updated on: May 13, 2022 | 11:21 PM

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील कमर्शियल इमारतीला ही आग लागली होती. या आगीत इमारतीत काम करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत आजूनही काही लोक अडकल्याची माहीती समोर आली आहे.

Delhi Fire Video : दिल्लीतल्या आगीतून जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, आगीत 26 मृत्युमुखी, अरविंद केंजरीवारांनी केला व्हिडिओ ट्विट
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज भीषण अग्नितांडव (Delhi Fire) घडलंय. या अग्नितांडवात तब्बल 26 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी लोक इमारतीवरून उड्या (Jump From Building) मारत होते. याचा व्हिडिओ दिल्लीचे मुख्यमत्री अरविंद केंजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विट केला आहे. या घटनेने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील कमर्शियल इमारतीला ही आग लागली होती. या आगीत इमारतीत काम करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत आजूनही काही लोक अडकल्याची माहीती समोर आली आहे. या दु:खद घटनेबद्दल धक्का बसला आणि वेदना झाल्या. मी सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आमचे अग्निशमन जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, अशा आशयाचे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर केले आहे.

अरविंद केजरीवाल यांचं ट्विट

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

दिल्लीत लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. मी शोकाकूल कुटुंबांसोबत आहे. जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा मी व्यक्त करतो अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचं ट्विट

राष्ट्रपतींनीही व्यक्त केला शोक

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने दुःखी झालोय. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा मी व्यक्त करतो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट