सज्ञान मुलीला आपल्या मर्जीने कुठेही आणि कुणासोबतही राहण्याचं स्वातंत्र्य : दिल्ली उच्च न्यायालय

वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या सज्ञान मुलीला कोठे आणि कुणासोबत राहायचं हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:50 PM, 26 Nov 2020

नवी दिल्ली : वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या सज्ञान मुलीला कोठे आणि कुणासोबत राहायचं हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. यावेळी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील सिद्धांताचा पुनरुच्चार केला. एका कुटुंबाने आपली 20 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करत याचिका केली होती. नंतर या कुटुंबाने मुलीला फूस लावून कटुंबापासून दूर केल्याची तक्रार केली होती. यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निवाडा दिला आहे (Delhi High Court on Right to Choose of a adult girl without permission of Family).

या प्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने थेट संबंधित 20 वर्षीय मुलीचा जबाब ऐकला. ही मुलगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर होती. यावेळी संबंधित मुलीने आपण स्वतःच्या मर्जीने घर सोडल्याचं सांगितलं. तसेच तिने लग्न केल्याचंही न्यायालयात सांगितलं. यानंतर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालाचा आधार घेत पुन्हा एकदा निवडीच्या स्वातंत्र्याचा पुनरुच्चार केला. तसेच हे प्रकरण निकाली काढलं.

मुलीला सुरक्षित पतीच्या घरी सोडा, न्यायालयाचा आदेश

मुलीच्या जबाबानंतर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तरुणीला सुरक्षित आपल्या पतीच्या घरी सोडण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाला कायदा हातात न घेण्यास समजावण्याचेही निर्देश पोलिसांना दिले. इतकंच नाही तर पोलीस प्रशासनाने संबंधित परिसरातील बीट पोलीस अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक या जोडप्याला द्यावा जेणेकरुन गरज लागेल तेव्हा ते फोन करु शकतील, असंही सांगितलं. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विपिन सांघी आणि रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

हेही वाचा :

सण-उत्सव साजरे करण्यासाठी जिवंत राहणे गरजेचं, दिल्ली हायकोर्टाने ठणकावलं, छठ याचिका फेटाळली

तुमची जगभरात वाहवा, कठीण काळातही भन्नाट काम, मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून तोंडभरुन कौतुक

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करुन भ्रष्टाचाराची चौकशी करा, उच्च न्यायालयाचे आदेश

व्हिडीओ पाहा :

Delhi High Court on Right to Choose of a adult girl without permission of Family