‘तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही’, दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:21 PM, 4 May 2021
'तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही', दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं
दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. अशावेळी काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर व्हेटिलेटर्सही कमी पडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही’, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. (Delhi High Court slams central government over oxygen supply)

उच्च न्यायालयात अमिकस क्यूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अनेक लोकांना ऑक्सिजन मिळत नसल्यानं आपला जीव गमवावा लागत आहे. काही जागांवर ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. जेणेकरुन ऐनवेळी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा सल्लाही अमिकस क्यूरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिला आहे.

यावर महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची गरज भागत असेल तर महाराष्ट्रातील काही टँकर दिल्लीला पाठवले जाऊ शकतात, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यावर केंद्राने सांगितलं की, आम्ही उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर करत आहोत. आम्ही या तथ्यापर्यंत जाणार नाही की 700 MT चा पुरवठा केला जावा की ऑक्सिजनचा बाकी कोटा पूर्ण केला जावा.

मनीष सिसोदियांचं राजनाथ सिंहांना पत्र

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केलीय.

‘राजधानी दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

‘दिल्लीला अद्याप गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा नाही’

ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू; कर्नाटक हादरले

मोठी बातमी: राजीव सातवांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन लेव्हल वाढली, उपचारांना प्रतिसाद

Delhi High Court slams central government over oxygen supply