India Corona Cases | भारतातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक, दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट 

दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोनाची लस घेतली आहे. (India Corona Cases Latest Update)

India Corona Cases | भारतातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक, दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट 
corona
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 12:08 PM

मुंबई : देशातील अनेक राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे देशातील वाढत्या कोरोना रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. गेल्या दोन दिवसात भारतातील कोरोनाबाधितांमध्ये (India Corona Cases) घट झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (India Corona Cases Latest Update)

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 2 कोटी 02 लाख 82 हजार 833 पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे 3,449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 2 लाख 22 हजार 408 इतका झाला आहे.

तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3 लाख 20 हजार 289 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात 34 लाख 47 हजार 133 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

(India Corona Cases Latest Update)

दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट 

भारतात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशात 2 मे रोजी 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल 3 मे रोजी 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले होते. तर गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 35 हजार 259 रुग्णांची घट पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रूग्ण – 3,57,229 देशात 24 तासात मृत्यू – 3,449 देशात 24 तासात डीस्चार्ज -3,20,289 एकूण रूग्ण – 2,02,82,833 एकूण मृत्यू – 2,22,408 एकूण डीस्चार्ज – 1,66,13,292 एकूण एक्टीव्ह रूग्ण – 34,47,133 आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -15,89,32,921

(India Corona Cases Latest Update)

संबंधित बातम्या : 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी

Corona Crisis | देशात कोरोनाचा कहर, 15 दिवसात 50 लाख बाधितांची वाढ

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.