Corona Crisis | देशात कोरोनाचा कहर, 15 दिवसात 50 लाख बाधितांची वाढ

यानंतर 121 दिवसात 50 लाख रुग्ण समोर आले होते. तर 15 दिवसांत 50 लाख बाधित आढळले आहेत. (India 2 crore corona case)

Corona Crisis | देशात कोरोनाचा कहर, 15 दिवसात 50 लाख बाधितांची वाढ
Corona Pandemic
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 9:47 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या (Corona Virus) संख्येत सातत्याने वाढत आहेत. काल देशभरात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा 2 कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे 2 कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आढळ्याने भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. (India become second country which crosses 2 crore corona case)

देशभरात 3 मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. काल देशभरात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. साधारण 197 दिवसांमध्ये 15 सप्टेंबर 2020 पर्यंत हा कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर 94 दिवसांपर्यंत 18 डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 1 कोटीपर्यंत पोहोचला. यानंतर 121 दिवसात 50 लाख रुग्ण समोर आले आहेत आणि 15 दिवसांत 50 लाख बाधित आढळले आहेत.

देशात कोरोना रुग्णवाढीचा अंदाज 

आयआयटी (हैदराबाद) चे प्राध्यापक आणि कोरोना सुपर मॉडल समितीचे प्रमुख डॉ. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात कोरोना रुग्ण वाढत आहे. गेल्या 13 मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. पण ती किती पटीने वाढते याचा अंदाज लावण्यासाठी आमच्याकडे पुरेसा डेटा नव्हता. त्यानंतर  2 एप्रिलला पुन्हा एकदा औपचारिक भविष्यवाणी केली गेली. यात 15 ते 22 मे दरम्यान दररोज सुमारे 1.2 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

डॉ. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला यापूर्वी 15 ते 22 मे दरम्यान दररोज सुमारे 1.2 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळतील, याची माहिती दिली होती. तसेच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळले, अशीही माहिती यात देण्यात आली होती.

सद्यस्थितीत देशात साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आयआयटी (कानपूर) ने दिलेल्या सूचनेनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येत्या 8 मे पर्यंत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर 14 ते 18 मे दरम्यान देशात 38 ते 44 लाख सक्रीय रुग्ण असल्याचा अंदाज आहे.

केंद्राकडे अनेक सवाल

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल जर केंद्र सरकारला माहिती होते, तर मग त्यांनी दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी प्रयत्न का केले नाही? कोणत्याही उपाययोजनांबद्दलची माहिती का दिली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 18 हजार 959 देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 34 लाख 13 हजार 642

(India become second country which crosses 2 crore corona case)

संबंधित बातम्या : 

India Corona Cases | भारतातील नागरिकांना दिलासा, कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काहीशी घट

राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली, सर्वाधिक मृत्यूदर कोणत्या जिल्ह्यात?

Maharashtra Corona | राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.