CJP चं आंदोलन समाजकंटकाकडून हायजॅक; दिल्ली पोलिसांचा खळबजनक दावा, म्हणाले, ‘खाकी वर्दीवर…’

CJP Protest : दिल्लीतील आंदोलनावरून पोलिसांनी धक्कादायक दावा केला आहे. या आंदोलनात समाजकंटकांनी शिरकाव केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

CJP चं आंदोलन समाजकंटकाकडून हायजॅक; दिल्ली पोलिसांचा खळबजनक दावा, म्हणाले, खाकी वर्दीवर...
| Updated on: Jul 23, 2026 | 3:07 PM

दिल्लीच्या जंतर-मंतरच्यावरील नीट पेपरफुटीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. या आंदोलनाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झाली. परंतु दिल्लीत खाकी वर्दीवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन समाजकंटकांनी हाती घेतल्याचाही मोठा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

आंदोलनात समाजकंटकाचा शिरकाव 

दिल्ली पोलिसांनी दावा करताना म्हटलं की, ‘विद्यार्थ्याच्या आंदोलनात समाजकंटक घुसले आहेत. या समाजकंटकाकडून खाकी वर्दीवर हल्ला केला जात आहे. समाजकंटकाने हल्ला केल्यानंतर तरुणांचा जमाव आक्रमक होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लष्करी दलाव्यतिरिक्त इतर दलानेही या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आंदोलनातील पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी सरकारने अद्याप कोणताही कारवाईचा आदेश दिलेला नाही. सरकार हे विद्यार्थ्यासोबत वाटाघाटीचा मार्ग शोधत आहेत. सध्या सुरक्षा जवान स्वत:चा जीव वाचवायचे काम करत आहेत. त्यांच्याकडून तीव्र उत्तर दिले जात नाही’.

सकाळी शांततापूर्ण आंदोलन, सायंकाळी पोलिसांना लक्ष्य 

जंतर-मंतरवलील अनेक फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओत चेहऱ्यावरील मास्क लावून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. समाजकंटक आंदोलकांनी मध्यरात्री आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला केला. आंदोलकांनी बॅरिकेट्सवर चढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतरही काही पोलीस मैदानात उभे होते. या आंदोलनात काहींनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यामुळे पोलीस त्यांना ओळखू शकले नाही, असेही त्यांनी सांगितले. जंतर-मंतरवर गुरुवार सकाळपासून शांतता आहे. जंतर-मंतर मैदान अर्ध भरलं आहे. या मैदानात आंदोलक येताहेत, कविता वाचत आहेत. घोषणाबाजी करत आहेत. शातंतापूर्ण आंदोलन करत आहेत. परंतु जंतर-मंतरवर सायंकाळ झाल्यानंतर गर्दी वाढते. त्यानंतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन होते. यात पोलिसांना लक्ष्य केलं जात आहे. दगडफेक केली जाते,असा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन रस्त्यावर होत आहे.

Follow Us