AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…

गेल्या तीन वर्षांपासून एका लहानग्या मुलाची सुरू असलेली कठीण शोधमोहीम अखेर सुखद वळणावर पोहचली आहे. एका मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात पोलिसांना यश आले आहे.

तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी...
juhu missing boy found
| Updated on: Jul 23, 2026 | 4:56 PM
Share

पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षांपासून एका आपल्या आईवडीलांच्या छत्रछायेतून नाहीशा झालेल्या अनाथ मुलाला अखेर त्याच्या पालकांच्या हाती सुखरुपपणे सोपवणे मुंबई पोलिसांना शक्य झाले आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की दोन वेगवेगळी नावांमुळे एका मुलाची फाईल तीन वर्षे तपासाअभावी पेडिंग होती. मात्र,पोलिसांनी या मुलाला अखेर त्याच्या पालकांच्या हाती सुखरुप पोहचवलेच…कसे ते वाचा…

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने 2023 मध्ये अपहरण झालेल्या 8 वर्षीय मुलाला सुखरूप शोधून त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अंधेरीच्या एका अनाथालयातून एका 8 वर्षांचा मुलगा अचानक गायब झाला होता. ही घटना 22 ऑक्टोबर 2023 ची आहे. अंधेरी पूर्व येथील स्नेह सदन बाल अनाथालयातून 8 वर्षीय अनिस खान नावाचा मुलगा अचानक गायब झाला होता. अनाथालयाच्या कर्मचारी चंचल प्रसाद नायर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर तपासात एक माहिती उघडकीस आली.

तपासात समोर आले की, अनिसला जुहू चौपाटीवर बेवारस फिरताना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नातेवाईकांचा त्यांचा पत्ता न मिळाल्याने 21 ऑक्टोबर 2023 रोजी त्याला ‘स्नेह सदन’मध्ये पाठवण्यात आले होते. पण दुसऱ्याच दिवशी तो तिथून बेपत्ता झाला. दोन वेगवेगळ्या नावांमुळे आणि कोणताही पुरावा नसल्याने हा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान बनला होता.

पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ 10 च्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. पीएसआय सागर हुजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने CCTNS, ICJS पोर्टल, मिसिंग पर्सन सर्च सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 चा आधार घेतला. त्याचबरोबर मुंबईतील सर्व बाल अनाथालयांना भेटी देऊन 2023 पासून दाखल झालेल्या 8 ते 13 वयोगटातील मुलांची माहिती गोळा केली.

MIDC police reunite missing boy

MIDC police reunite missing boy

शेवटी माटुंगा येथील बाल सुधारगृहात अमन शेख या नावाने दाखल असलेल्या मुलाचा फोटो अनिसशी जुळला. मालवणी परिसरातील नातेवाईकांना फोटो दाखवताच त्यांनी त्याला आपला भाचा म्हणून ओळखले.दोन वेगवेगळ्या नावांमुळे 3 वर्षे फाईलमध्ये अडकले हे प्रकरण एमआयडीसी पोलिसांनी फक्त एका फोटोमुळे आणि अथक मेहनतीने सोडवले.पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे आणि मुलाला कुटुंबाशी पुन्हा भेटवून दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच