फुफ्फुसाचे तुकडे, रक्ताळलेला हात, दिल्ली स्फोटात काय घडलं? 5 प्रश्न, 5 उत्तरं!

राजधानी दिल्लीमध्ये एक मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून देशभरात खळबळ उडाली आहे. या स्फोटाचे हादरवून टाकणारे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

फुफ्फुसाचे तुकडे, रक्ताळलेला हात, दिल्ली स्फोटात काय घडलं? 5 प्रश्न, 5 उत्तरं!
DELHI RED FORT BLAST
| Updated on: Nov 10, 2025 | 8:13 PM

Delhi Red Fort Blast : देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ उडाली आहे. या स्फोटात आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे या स्फोटात डझनभर गाड्या जळून खाक झाल्या आहेत. हा स्फोट झाल्याचे समोर येताच आता दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार स्फोटाच्या ठिकाणी मानवी फुफ्फुस, हाताचे तुकडे दिसून आले आहेत. त्यामुळे ही घटना खूपच भीषण आणि गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार केला जात आहेत. असे असतानाच या स्फोटाबाबतीत पाच प्रश्नांची पाच उत्तरे जाणून घेऊ या…

1) स्फोट नेमका कुठे झाला?

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, त्याच्या अगदी जवळच लाल किल्ला आहे. पार्किंगमध्ये एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला आहे. स्फोट होताच पार्किंगमध्ये आगीचे लोळ दिसत होते. हा स्फोट झाला तेव्हा परिसरात मोठा आवाज झाला. तसेच काही इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत.

2) हा स्फोट नेमका कधी झाला?

मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी झाला.

3) स्फोटाचे नेमके कारण काय?

या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गाड्यांचेही फक्त सांगाडेच उरलेले आहेत. इको व्हॅनमध्ये स्फोट झाल्यानंतर हे मृत्यूकांड घडले आहे. या व्हॅनमध्ये स्फोट नेमका का झाला? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

4) बॉम्बस्फोट की फक्त स्फोट?

इको व्हॅनमध्ये झालेला हा स्पोट नेमका कशाचा होता? हेही अद्याप समोर आलेले नाही. सुरुवातीला या व्हॅनमधील बॅटरीचा स्फोट झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात होती. आता मात्र या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर हा फक्त बॅटरीचा स्फोट होता की यामागे बॉम्बस्फोटाचे कारस्थान आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

5) रस्त्यावरची काय स्थित होती?

हा स्फोट झाला तेव्हा एका सेकंदात मोठी आग लागली. हा स्फोट एवढा भीषण होता की यात साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक झाली आहेत. रस्त्यावर फक्त वाहनांचे सांगाडे दिसत आहेत. वाहनांचे टायर, सीट जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. त्यानंतर रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढला. पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी हा परिसर सील करण्यात आला आहे.