नातेवाईकाकडे हवापालटासाठी आला, अन् चक्क 3 कोटींचा मालक बनला, कसं काय ?

देव देतो तर छप्पर फाडके देतो असा प्रत्यय एका नागरिकाला आला आहे. दिवाळीच्या सुट्टी निमित्त आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेलेल्या या व्यक्तीने सहज पाचशे रुपयाचे तिकीट खरेदी केले आणि् त्याला ही लॉटरी लागल्याने त्याचे नशीबच पालटले आहे.

नातेवाईकाकडे हवापालटासाठी आला, अन् चक्क 3 कोटींचा मालक बनला, कसं काय ?
प्रतिकात्मक फोटो ( AI )
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 1:38 PM

माणसाचं नशीब कधी त्याला कधी साथ देईल हे सांगता येत नाही. असाच एक किस्सा एका व्यक्तीबाबत घडला आहे. तो आपल्या नातेवाईकाकडे सुट्टी निमित्त हवापालट करण्यासाठी गेला होता. आणि तेथे त्याने 500 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. या तिकीटाने त्याच्या नशीबाचे दार उघडले. काय आहे हा प्रकार पाहा….

दिल्लीचे निवासी लव कुमार यांना ही दिवाळी कायम लक्षात राहील अशी आहे. कारण या दिवाळीने त्यांच्यावर छप्पर फाडके पैशाची बरसात झाली आहे. आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेलेल्या लव कुमार याने 500 रुपयाचे लॉटरीचं तिकीट काढले होते. या लॉटरीचा तीन कोटीचं बक्षिस त्याला लागले आहे. लॉटरीचे तिकीट जिंकल्यानंतर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की हे मला लागलेले पहिले लॉटरीचे बक्षिस आहे. या बक्षिसाची संपूर्ण रक्कम ते आपल्या आईला देणार आहेत. कारण आपल्यासाठी आपली आईच सर्वकाही असल्याचे लव कुमार यांचे म्हणणे आहे. त्यांना लॉटरी लागल्याने त्यांचे कुटुंब खूप आनंदी झाले आहे. या यशाने आपल्या जीवनाला वेगळी दिशा दिल्याचे लव कुमार यांचे म्हणणे आहे.

पंजाब सरकारची लॉटरीत जिंकली रक्कम

पंजाब राज्य सरकारद्वारे दिवाळीच्या सणा निमित्त जारी केलेल्या डीअर दिवाळी बंपर लॉटरीचा निकाल 2024 जाहीर झाला त्यात हे बक्षिस मिळाले आहे. या लॉटरीचे पहिले बक्षिस 6 कोटी रुपये आहे.दोन विजेत्यात ते वाटले गेले. ही पंजाब राज्यातील सर्वात मोठी लॉटरी मानली जाते.यावेळी हजारो लोकांनी याची तिकीटे काढली होती. पहिला पुरस्कार दोन भागात ( सहा कोटी ) वाटला गोला. त्यामुळे दोन्ही विजेत्याना 3-3 कोटी प्रत्येकी मिळाले. बक्षिस मिळालेल्या तिकीटाचा नंबर A सिरीजमध्ये 540826 आणि बी सिरीजमध्ये 480960 होते. या लॉटरी विजयाने लव कुमारचे नशीब बदलले.

हे सुद्धा वाचा
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.