Delhi Malviya Nagar Fire : विवेकसह संपूर्ण कुटुंब संपलं ! वडिलांच्या उपचारांसाठी आलेल्या 8 जणांचा दिल्लीतील अग्निकांडात मृत्यू
Delhi Hotel Fire News: बुधवारी दिल्लीतील मालवीय नगरमधील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये आग लागून तब्ब्ल 21 जणांचा मृत्यू झाला. यात एक अख्खं कुटुंबही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीला आलेले गुरुग्रामचे विवेक अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांनी या आगीत जीव गमावल.

राजधानी दिल्लीतील मालवीय नगरमधील हौझ राणी येथील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला. या आगीमुळे अनेक कुटुंबांचं हास्य गिरावलं गेलं आणि त्यांच्या पदरात पडलं आपल्या जिवलगांच्या वियोगाचं दु:ख… या अतिशय हृदयद्रावक घटनेत गुरुग्रामच्या सेक्टर 46 चे रहिवासी असलेले 45 वर्षीय विवेक अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचाही मृत्यू झाला. त्याचे कुटुंब एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते आणि ते जेवणासाठी लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये गेले होते. मात्र तेथील आगीत सर्वांचा मृत्यू झाला. या अपघाताची बातमी समजताच, विवेक अग्रवाल यांच्या गुरुग्रामच्या सेक्टर 46 मधील त्यांच्या घराबाहेर शांतता पसरली. जे कुटुंब नेहमी हसून त्यांचे स्वागत करायचे, ते आता या जगात नाही, या गोष्टीवर त्यांचे शेजारी आणि ओळखीच्या लोकांचा अजूनही विश्वासच बसत नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्रवाल हे एका खासगी कंपनीच चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील राधेश्याम अग्रवाल यांची तब्येत ठीक नसून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडिलांना भेटण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य दिल्लीला गेले होते. ते सर्वजण मालवीय नगरमधील हॉटेलमध्ये थांबले होते, मात्र तिथेच आगीच्या घटनेत त्या सर्वांचा मृत्यू झाला.
नाश्ता करताना अचानक लागली आग आणि एकच गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या या दुर्घटनेवेळी अग्रवाल यांचं कुटुंब हॉटेलमध्ये उपस्थित होतं. सकाळी हॉटेलमध्ये अचानक आग लागली. आग झपाट्याने पसरली आणि हॉटेलचे अनेक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही.
या दुर्दैवी घटनेत विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी अग्रवाल, आई प्रेमलता अग्रवाल, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य ठार झाले. या दुर्घटनेत कुटुंबातील दोन मुलींचाही मृत्यू झाला. काल हॉटेलला लागलेल्या आगीत एकूण 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, त्यापैकी आठ जण गुरुग्रामचे होते.
शेजाऱ्यांना विश्वसच बसत नाही
विवेक अग्रवाल हे खूप मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे होते, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्यांचं कुटुंब सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होत असे आणि तो परिसरात चांगलाच परिचित होता, असंही त्यांन नमूद केलं. या दुर्घटनेच्या बातमीने संपूर्ण परिसर हादरला आहे असं शेजारी योगेंद्र यादव म्हणाले. काही दिवसांपूर्वीपर्यंत इतकं आनंदी असलेलं अग्रवाल कुटुंब अशा दुर्दैवी घटनेला बळी पडेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. विवेक आणि त्याचे कुटुंब खूप मनमिळाऊ होते आणि ते सर्वांशी आपुलकीने वागत असत, अशी आठवण इतर शेजाऱ्यांनी सांगितली.
अपघातानंतर सेक्टर 46 मध्ये शोकसभा पसरली आहे. नातेवाईक आणि ओळखीचे लोक अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी सतत भेट देत आहेत. तसेच प्रशासन आणि कुटुंबीयांकडून अधिकृत माहितीची लोकं आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व कुटुंबीयांच्या प्रकृतीबाबत सध्या प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी स्थानिक लोक मृतदेह गुरुग्राममध्ये येण्याची वाट पाहत आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.