दिल्ली दंगल: जेलमध्येच राहणार शर्जिल इमाम आणि उमर खालिद, हायकार्टाचा झटका

दिल्ली हायकोर्टाचे न्या.नवीन चावला आणि न्या.शैलेंद्र कौर यांच्या खंडपीठाने शर्जिल इमाम, उमर खलिद, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, अतहर खान, मीरान हैदर, अब्दुल खालिद सैफी, तस्लीम अहमद आणि गुलफिशा फातिमा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

दिल्ली दंगल: जेलमध्येच राहणार शर्जिल इमाम आणि उमर खालिद, हायकार्टाचा झटका
Sharjeel Imam and Umar Khalid
| Updated on: Sep 02, 2025 | 5:56 PM

फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीत झालेल्या दंगली मागे कटकारस्थानातील आरोपींना हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने दंगलीचा कट आणि कारस्थानाशी संबंधित बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) प्रकरणात मंगळवारी शर्जिल इमाम, उमर खालिद यांच्यासह ९ आरोपींचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दिल्ली हायकोर्टाचे न्या.नवीन चावला आणि न्या.शैलेंद्र कौर यांच्या खंडपीठाने शर्जिल इमाम,उमर खालिद, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, अतहर खान, मीरान हैदर, अब्दुल खालीद सैफी, तस्लीम अहमद आणि गुलफिशा फातिमा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी जामीनाला केला विरोध

दिल्ली हायकोर्टाने १० जुलै रोजी आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी ऐकल्यानंतर आता निकाल राखून ठेवला होता. सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांनी जामीन याचिकांना विरोध केला होता. ही उत्स्फुर्त दंगल नव्हती तर सुनियोजित कट होता असा दावा पोलिसांनी केला होता.

तुषार मेहता यांनी काय म्हटले होते?

सरकारी पक्षाच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला होता की हा जगात भारताला बदनाम करण्याचा कट होता. त्यामुळे आरोपी खूप काळ कैदेत आहेत म्हणून जामीन देणे योग्य नाही असे मेहता यांनी सांगितले. सरकारी पक्षाने जामीन याचिकांना जोरदार विरोध करत हा केवळ दंगलीचा मुद्दा नव्हता तर दंगलीचा कट मोठ्या षडयंत्राचा एक भाग होता.

दिल्ली दंगलीत 53 जणांचा मृत्यू

फेब्रुवारी 2020 साली झालेल्या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हिंसाचार नागरी सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) च्या विरोधात प्रदर्शन करताना उसळली होती. शर्जिल इमाम, खालिद सैफी, गुलफिशा फातिमा आणि अन्य आरोपीच्या जामीन अर्ज साल 2022 पासून हायकोर्टात प्रलंबित असून वेळोवेळी विविध खंडपीठाकडे सुनावणी झालेली आहे.