..म्हणून नवरा-बायकोने 1400 किलोमीटर अंतरावरुन येऊन महिला प्रोफेसरला संपवलं, रहस्यमयी हत्या प्रकरणाचा खुलासा
महिला प्राध्यापिक 2022 साली नवऱ्यापासून वेगळी झाली. तेव्हापासून ती एकटीच या फ्लॅटमध्ये राहत होती. हे जोडपं जेव्हा आलं, त्यावेळी त्यांचा लहान मुलगाही सोबत होता.

चार दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापिकेची पूर्व दिल्लीत तिच्या राहत्या घरी हत्या झाली होती. दिल्ली विद्यापीठात मृत महिला सहाय्यक प्राध्यापिका होती. या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला. दिल्ली पोलिसांना या रहस्यमयी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलं आहे. प्राध्यापिकेच्या वडिलोपार्जित घराच्या वादातून ही हत्या झाली. घराच्या विक्रीचा वाद वाढत गेला. चार जून रोजी लांबच्या नातेवाईकांनी घरी येऊन तिची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. दिल्लीच्या वसुंधरा एनक्लेव्ह येथे ही महिला राहत होती. 45 वर्षीय महिला प्रोफेसर राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. तिचं मनगट चिरलेलं होतं. डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. अटक केलेले दोन्ही आरोपी नवरा-बायको असून या महिलेचे भाडेकरु होते. पश्चिम बंगाल बरद्वानमध्ये या महिलेचं वडिलोपार्जित घर आहे. तिथे ते 2023 पासून भाडेकरु म्हणून रहायचे.
कौटुंबिक संपत्तीच्या वाटणीमध्ये ते घर महिला प्राध्यापिकेला मिळालेलं. महिला प्रोफेसर ते घर रिकामी करण्यासाठी त्यांच्यामागे लागली होती. त्यातून वाद वाढत गेला. जोडप्याला बरद्वानमधलं ते घर विकत घ्यायचं होतं. त्यासाठी महिला प्रोफेसरचे आई-वडिल, दोन्ही भावंडं तयार होती. पण ती तयार नव्हती. वडिलोपार्जित घर विकण्याच्या कुटुंबाच्या निर्णयाला तिचा विरोध होता. त्यामुळे जोडप्याच्या मार्गात ही महिला अडथळा बनली होती. त्यांनी तिला अनेकदा विनंती केली. पण महिला प्रोफेसर ऐकायला तयार नव्हती. तिचा विरोध कायम होता. म्हणून हे नवरा-बायको महिलेला संपवण्यासाठी कोलकात्यावरुन दिल्लीला आलं. बुधवारी त्यांनी महिलेची हत्या केली व ते परत कोलकात्याला निघून गेले.
त्यावेळी त्यांचा लहान मुलगाही सोबत होता.
मृत महिलेने घर रिकामी करण्यासाठी या जोडप्याला शेवटची वॉर्निंग दिली होती असं पोलीस तपासात समोर आलय. म्हणून या जोडप्याने महिलेला संपवण्याचा निर्णय घेतला. जवळपास 1400 किलोमीटर अंतर कापून हे नवरा-बायको दिल्लीला आले. त्यांनी महिला प्रोफेसरची हत्या केली व ते परत निघून गेले. आरोपी महिलेला ओळखत होते. म्हणून सहाव्या मजल्यावरील महिलेच्या घरात त्यांना सहज प्रवेश मिळाला. महिला प्राध्यापिक 2022 साली नवऱ्यापासून वेगळी झाली. तेव्हापासून ती एकटीच या फ्लॅटमध्ये राहत होती. महिला प्रोफेसरची हत्या करण्यासाठी हे जोडपं आलं, त्यावेळी त्यांचा लहान मुलगाही सोबत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी ओळख लपवून आल्याचं दिसतय. त्यांनी पायऱ्या आणि लिफ्ट दोघांचा वापर केला.